अंगावर वीज पडून युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:14 IST2021-06-01T04:14:16+5:302021-06-01T04:14:16+5:30

पेरणी तोंडावर आल्याने शेती कामे करण्यासाठी पाळोडी येथील तुकाराम टरपले हे आपल्या कुटुंबीयांसमवेत ३१ मे रोजी शेतात गेले होते. ...

Young man dies after being electrocuted | अंगावर वीज पडून युवकाचा मृत्यू

अंगावर वीज पडून युवकाचा मृत्यू

पेरणी तोंडावर आल्याने शेती कामे करण्यासाठी पाळोडी येथील तुकाराम टरपले हे आपल्या कुटुंबीयांसमवेत ३१ मे रोजी शेतात गेले होते. कामे सुरू असतानाच दुपारी १.१५ वाजण्याच्या सुमारास वादळी-वाऱ्यासह पावसाला प्रारंभ झाला. यामुळे तुकाराम टरपले यांचा मुलगा ज्ञानेश्वर (१९), त्यांची पत्नी तसेच भावाचे कुटुंब शेतातील आखाड्यावर थांबले. दुपारी दीड वाजता पाऊस थांबल्याने ज्ञानेश्वर टरपले हा घराकडे निघाला होता. शेतापासून काही अंतरावर गेल्यावर त्याच्या अंगावर वीज कोसळली. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. ज्ञानेश्वर टरपले हा पदवीचे शिक्षण घेत होता. वडिलांना शेतीकामात मदत करण्यासाठी तो शेतात आला होता. मात्र, आई-वडिलांच्या समोरच वीज पडून मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Web Title: Young man dies after being electrocuted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.