शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

'मजदूर परेशान, किसान बेहाल'; परभणीत पंतप्रधानांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 12:54 IST

कॉ.राजन क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात केंद्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

ठळक मुद्देआंदोलनानंतर कार्यकत्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नवा मोंढा पोलीस ठाण्यात नेले.

परभणी: शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्ली येथे सुरू झालेल्या आंदोलनास सहा महिने पूर्ण झाले असूनही केंद्र शासनाने या आंदोलनाची उपेक्षा केल्याच्या निषेधार्थ २६ मे रोजी सकाळी ११ च्या सुमारास कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळ्यात आला. 

कॉ.राजन क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात केंद्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच  शेतकरी  व कामगार विरोधी कायदा रद्द करावा, सर्व जनतेचे १०० टक्के लसीकरण शासनाच्या वतीने करावे, निष्काळजीपणामुळे झालेल्या रुग्ण मृत्यू प्रकरणी न्यायालयीन चौकशी आयोग नेमण्यात यावा, परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीमुळे बाधित पिकांना पिक विमा भरपाई द्यावी, सर्व जॉबकार्डधारक मजुरांना ७ हजार ५०० रुपये प्रतिमाह कोविड लॉकडाऊन मदत द्यावी, आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. तसेच केंद्र शासनाच्या निषेधार्थ २६ मे काळा दिवस पाळण्यात आला. यानिमित्त घरावर काळे झेंडे लावणे, काळ्या फिती लावणे, निवडक ठिकाणी निदर्शनेही करण्यात आली. आंदोलनात कॉ. राजन क्षीरसागर, लक्ष्मण काळे, शेख अब्दुल, माधुरी क्षीरसागर, ज्ञानेश्वर काळे, श्रीनिवास वाकणकर, बाळासाहेब हरकळ, नवनाथ कोल्हे, शिवाजी कदम, तुषार पालकर, आसाराम जाधव, आसाराम बुधवंत, ओंकार पवार, सरपंच प्रकाश गोरे, अनिल पंडित आदींनी सहभाग नोंदविला. आंदोलनानंतर कार्यकत्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नवा मोंढा पोलीस ठाण्यात नेले.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीprime ministerपंतप्रधान