शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
3
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
4
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
5
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
6
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
7
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
8
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
9
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
10
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
11
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
12
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
13
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
14
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
15
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
16
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
17
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
18
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
19
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
20
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

वळण रस्त्याचे काम आठ दिवसानंतरही ठप्पच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:12 IST

परभणी शहर व परिसरात १० जून रोजी पहाटे मुसळधार पाऊस झाला होता. या पावसाने गंगाखेड रस्त्यावरील पिंगळगड नाल्याच्या परिसरात ...

परभणी शहर व परिसरात १० जून रोजी पहाटे मुसळधार पाऊस झाला होता. या पावसाने गंगाखेड रस्त्यावरील पिंगळगड नाल्याच्या परिसरात पावसाच्या पाण्याने पूर आला होता. यातच काम सुरू असलेल्या वळण रस्त्याचा काही भाग ढासळला होता. तसेच रस्त्याचा अंदाज न आल्याने सिमेंट घेऊन येणारा ट्रक परिसरात आडवा झाला होता. यामुळे या मार्गावरील वाहतूक दिवसभर ठप्प झाली होती. याच दिवशी या मार्गावरील गंगाखेडकडे जाणारी वाहतूक साखला प्‍लॉट, लोहगाव मार्गे सिंगणापूरकडे वळविण्यात आली. ११ ते २३ जूनच्या दरम्यान केवळ दुचाकी व छोट्या वाहनांना पिंगळगड नाल्यावरील नव्या पुलावरून वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे. आठ दिवसापासून नवीन पुलावरून छोट्या वाहनांची ये-जा सुरू आहे. मात्र, अद्यापपर्यंत जुना ढासळलेला भाग संबंधित विभागाने व कंत्राटदाराने दुरुस्त केला नाही. तसेच त्याचा भराव बाजूला करुन डागडूजी केली नाही. अजून चार ते पाच दिवस या रस्त्याने केवळ छोटी वाहने ये-जा करण्यास परवानगी आहे. या कालावधीत तरी हे काम पूर्ण होणार का ? असा प्रश्न वाहनधारकांना पडला आहे.

दोन ठिकाणी पोलीसांची तपासणी

शहरातील उड्डाणपूल परिसरातून परळी रेल्वे गेटकडे जाणाऱ्या साखला प्लाँटमार्गे गंगाखेडकडे जाणारी जड वाहने वळविण्यात आली आहेत. यासाठी येथे पोलीस कर्मचारी नियुक्त केले आहेत. तसेच सिंगणापूर येथेही थेट परभणी शहरात जड वाहने येऊ नयेत, याकरिता पोलीसांनी बँरिकेंटिंग उभारली आहे. यामुळे जड वाहनांना पिंगळगड नाल्यावर थेट प्रवेश मिळण्यास बंदी कायम आहे.