शेतात कापूस वेचताना महिलेचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:30 IST2020-12-03T04:30:39+5:302020-12-03T04:30:39+5:30
पेठपिंपळगाव शिवारातील शेतात कापूस वाचण्यासाठी ३० वर्षीय महिला गेली होती. शेतात आसपास कोणी नसल्याने महिलेला एकटे पाहून २७ नोव्हेंबर ...

शेतात कापूस वेचताना महिलेचा विनयभंग
पेठपिंपळगाव शिवारातील शेतात कापूस वाचण्यासाठी ३० वर्षीय महिला गेली होती. शेतात आसपास कोणी नसल्याने महिलेला एकटे पाहून २७ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ च्या सुमारास तीन जणांनी पाठीमागे जाऊन वाईट हेतूने शरीराला स्पर्श केला. तसेच पैसे देण्याचे आमिष दाखविले. याप्रकरणी पालम पोलिसांत महिलेच्या फिर्यादीवरून आरोपी धनंजय बाबाराव शिंदे, संदीप दिलीप पौळ, आदर्श संभाजी खोडवे (सर्व रा. पेठपिंपळगाव ) या तिघांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. या आरोपीना १ डिसेंबर रोजी रात्री १० वाजता अटक करण्यात आली. तपास उपनिरीक्षक संदीप भोसले, जमादार बलभीम पोले, गोविंद चुडावकर हे करीत आहेत.