शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

पार्टीसाठी कोंबड्या दिल्या नाहीत म्हणून पतीची पत्नीस मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 14:28 IST

तालुक्यातील धनगरमोहा येथील पार्वती मोतीराम मदने यांनी शेतातील घरी कोंबड्या पोसलेल्या आहेत.

ठळक मुद्देपतीसह चुलत दिराविरुद्ध गुन्हा दाखल

गंगाखेड : पती व चुलत दिर पार्टी करण्यासाठी घरी पोसलेल्या दोन कोंबड्या घेऊन जात असतांना कोंबड्या नेऊ नका म्हणताच पती व चुलत दिराने पत्नीस मारहाण केल्याची घटना दि. २५ मे रोजी तालुक्यातील धनगरमोहा येथे घडली. कोंबडीवरून पत्नीला मारहाण करणाऱ्या पतीसह चुलत दिराविरुद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील धनगरमोहा येथील पार्वती मोतीराम मदने यांनी शेतातील घरी कोंबड्या पोसलेल्या आहेत. दि. २५ मे रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास पार्वती मदने यांचे पती मोतीराम नारायण मदने व चुलत दिर माणिक ज्ञानोबा मदने हे दोघे घरी येऊन दोन कोंबड्या घेऊन जाऊ लागले. तेंव्हा कोंबड्या कुठे घेऊन जात असे म्हणत पार्वतीबाई मदने यांनी पती व दिराला विचारले असता पार्टी करण्यासाठी कोंबडया नेत असल्याचे पतीने सांगितले. पार्टी करण्यासाठी कोंबड्या घेऊन जाऊ नका असे पार्वतीबाई मदने यांनी म्हणताच पती मोतीराम मदने याने शिवीगाळ करून त्यांना थापड बुक्क्यांनी मारहाण केली. तर कोंबड्या का नेऊ देत नाही म्हणत चुलत दिर माणिक मदने याने ही शिवीगाळ करून दगडाने उजव्या पायाच्या गुडघ्यावर मारून जखमी केले असल्याची फिर्याद पार्वतीबाई मोतीराम मदने यांनी दिली. यावरून दि. २५ मे रोजी रात्री उशीराने पती मोतीराम मदने व चुलत दिर माणिक मदने ( दोघे रा. धनगरमोहा ता. गंगाखेड ) यांच्या विरुद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास सपोउपनि टी. टी. शिंदे करीत आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारी