सोनपेठमध्ये कॅरिबॅगचा सर्रास वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:03 IST2021-02-05T06:03:57+5:302021-02-05T06:03:57+5:30
रस्त्यावर धुळीमुळे अडथळा पाथरी: आष्टी - पाथरी या रस्त्याचे काम सध्या वेगाने सुरू आहे. रस्त्यावर काम सुरू असताना पाण्याचा ...

सोनपेठमध्ये कॅरिबॅगचा सर्रास वापर
रस्त्यावर धुळीमुळे अडथळा
पाथरी: आष्टी - पाथरी या रस्त्याचे काम सध्या वेगाने सुरू आहे. रस्त्यावर काम सुरू असताना पाण्याचा वापर होत नसल्याने धुळीमुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याचे दुसऱ्या बाजूचे काम अद्यापही अपूर्ण आहे. त्याचा फटकाही वाहनधारकांना बसू लागला आहे.
विजेच्या लपंडावाने शेतकरी त्रस्त
परभणी : ग्रामीण भागात वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. सध्या रब्बी हंगामातील पिके वाढीच्या अवस्थेत असून, या पिकांना पाणी देणे गरजेचे असताना वीज पुरवठा गायब होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रभर जागून पिकांना पाणी द्यावे लागत आहे.
वाहतुकीच्या नियमांचा बोजवारा
परभणी : शहरात जागोजागी वाहतुकीच्या नियमांचा बोजवारा उडविला जात आहे. सर्रास नियम मोडत वाहने चालविली जात असल्याने शहरातील वाहतूक विस्कळीत होत आहे. विरुद्ध मार्गाने वाहने चालविणे, नो पार्किंगच्या जागेत वाहन उभे करणे, त्याचप्रमाणे ट्रिपल सीट वाहने चालविली जात आहेत. वाहतूक शाखेने याविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
बाजारपेठ भागात पुन्हा हातगाडे
परभणी : येथील गांधी पार्क परिसरातील हातगाडे महिनाभरापूर्वी वाहतूक पोलिसांनी हटविले होते. त्यामुळे या मार्गावर वाहतुकीसाठी होत असलेला अडथळा दूर झाला होता. मात्र आता पुन्हा परिस्थिती जैसे थे झाली आहे. गांधी पार्क भागात मोठ्या प्रमाणात फळ आणि भाजी विक्रेते थांबत आहेत.
शहरवासियांना आठ दिवसांआड पाणी
परभणी : शहरात पाण्याची समस्या कायम आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या येलदरी प्रकल्पात मुबलक प्रमाणात पाणीसाठा असतानाही केवळ नियोजनाचा अभाव असल्याने पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. मागील वर्षीच्या उन्हाळ्यात १३ ते १५ दिवसांतून एक वेळा शहराला पाणी मिळत होते. आता पाणी साठा मुबलक असतानाही ८ -८ दिवस पाण्यासाठी वाट पाहावी लागत आहे.