नियमांचा सर्रासपणे विसर...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:22 IST2021-02-27T04:22:58+5:302021-02-27T04:22:58+5:30

वालूर- सेलू रस्ता खराब देवगाव फाटा : सेलू तालुक्यातील महत्त्वाची बाजारपेठ असलेल्या वालूर येथे जाण्याकरिता सेलू - वालूर या ...

Widespread forgetting of rules ...! | नियमांचा सर्रासपणे विसर...!

नियमांचा सर्रासपणे विसर...!

वालूर- सेलू रस्ता खराब

देवगाव फाटा : सेलू तालुक्यातील महत्त्वाची बाजारपेठ असलेल्या वालूर येथे जाण्याकरिता सेलू - वालूर या १३ किलोमीटर रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून, या रस्त्यावरून वाहन चालवताना चालक व प्रवासी वैतागून जात आहेत.

मद्यपी वाहन चालकांवर कारवाई होईना

देवगाव फाटा : रस्त्यावरील अपघातातील सर्वात अधिक अपघात हे चालकांनी मद्यपान केल्याने होत आहेत, असे पोलीस यंत्रणेचे अनुमान असतानाही अशा मद्यपी चालकांवर कारवाई होताना दिसत नाही.

मास्क लावा... कोरोना टाळा...

देवगाव फाटा : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता याबाबत सेलू नगर परिषद सतर्क झाली आहे. दररोजच्या घंटागाडीच्या ध्वनीक्षेपाद्वारे मास्क लावा... कोरोना टाळा, सॅनिटायझरचा नियमित वापर करा, कुटुंबातील आजारी व्यक्तीची तातडीने तपासणी करा, शक्यतो घराबाहेर पडू नका, अशा प्रकारे आवाहनात्मक साद घातली जात आहे.

Web Title: Widespread forgetting of rules ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.