आठशे रुपयांची लाच घेताना मुख्याध्यापकास रंगेहाथ पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 19:12 IST2020-08-10T19:10:59+5:302020-08-10T19:12:35+5:30
सहकारी शिक्षकाचा थकीत पगार काढण्यासाठी घेतली लाच

आठशे रुपयांची लाच घेताना मुख्याध्यापकास रंगेहाथ पकडले
सेलू : सहकारी शिक्षकाचा पगार काढण्यासाठी ८०० रुपयांची लाच स्वीकारताना सेलू तालुक्यातील गुगळी धामणगाव येथील जि.प. शाळेच्या मुख्याध्यापकास १० आॅगस्ट रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
गुगळी धामणगाव जि.प. शाळेतील मुख्याध्यापक प्रकाश अर्जून अंभुरे यांनी शाळेतील एका सहकारी शिक्षकाचा सन २०१९ चा पगार काढण्यासाठी ५०० रुपये तर २०२० चे ३०० रुपये असे एकूण ८०० रुपयांची लाच मागितली. या संदर्भात शिक्षकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर सोमवारी गुगळी धामणगाव शाळेत सापळा लावण्यात आला. यावेळी ८०० रुपयांच लाच स्वीकारताना मुख्याध्यापक प्रकाश अंभुरे यास एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. या प्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.