शेतात कापूस वेचताना वीज कोसळली; महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2023 20:26 IST2023-04-08T20:25:26+5:302023-04-08T20:26:19+5:30
केवळ वीस फूट अंतरावर असणारी बहिण बचावली

शेतात कापूस वेचताना वीज कोसळली; महिलेचा मृत्यू
मानवत :तालुक्यातील मांडेवडगाव येथे वीज कोसळून एका ६० वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी ( ता.८ ) सकाळी साडे अकरा वाजण्याचा सुमारास घडली.
इंदुमती नारायण होंडे या शनिवारी सकाळी मांडेवडगाव शिवारातील आपल्या गट क्र. ८० येथील शेतात पती व बहिणीसोबत कापूस वेचणी करण्यासाठी गेल्या होत्या.यावेळी वातावरण अचानक बदल होऊन मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. इंदुमती होंडे यांच्या अंगावर वीज कोसळून त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यापासून केवळ वीस फूट अंतरावर असणाऱ्या इंदुमती होंडे यांच्या बहिणीला मात्र कोणतीही इजा झाली नाही. ग्रामस्थांनी त्यांना तातडीने परभणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकार्यांनी मयत घोषित केले.