१० हजारांची लाच घेताना मुख्याध्यापक व लिपीकास रंगेहाथ पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:13 IST2021-06-05T04:13:48+5:302021-06-05T04:13:48+5:30
परभणी शहरातील एमआयडीसी भागातील रिना करेवार मनोविकास विद्यालयातील एका शिक्षकास पगार नियमित करण्यासाठी आवश्यक असलेले मान्यता प्रमाणपत्र प्रभारी मुख्याध्यापक ...

१० हजारांची लाच घेताना मुख्याध्यापक व लिपीकास रंगेहाथ पकडले
परभणी शहरातील एमआयडीसी भागातील रिना करेवार मनोविकास विद्यालयातील एका शिक्षकास पगार नियमित करण्यासाठी आवश्यक असलेले मान्यता प्रमाणपत्र प्रभारी मुख्याध्यापक पुंजाराम नामदेवराव बुणगे यांच्याकडून हवे होते. यासाठी बुगणे व लिपीक संध्या वैद्य यांनी या शिक्षकास गुरुवारी १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. लाच देण्याची इच्छा नसल्याने सदरील शिक्षकाने परभणी येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार या विभागाने शुक्रवारी शाळेत सापळा रचला. दुपारी दीडच्या सुमारास तक्रारदार शिक्षकाकडून लाच घेताना प्रभारी मुख्याध्यापक पुंजाराम नामदेवराव बुणगे व लिपीक संध्या बाळासाहेब वैद्य यांना रंगेहाथ पकडले. याबाबत नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. ही कारवाई या विभागाच्या नांदेड येथील पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर व अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक भारत हुंबे यांच्या पथकाने केली.