मुलाने आत्महत्या केल्याचे समजताच, पुत्र विरहात पित्यानेही केली आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 17:05 IST2017-09-12T17:05:00+5:302017-09-12T17:05:20+5:30
मुलाने आत्महत्या केल्याचे पाहताच पुत्र विरहात पित्यानेही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना शहरातील सरगम कॉलनी येथे घडली आहे.

मुलाने आत्महत्या केल्याचे समजताच, पुत्र विरहात पित्यानेही केली आत्महत्या
परभणी, दि. 12 : मुलाने आत्महत्या केल्याचे पाहताच पुत्र विरहात पित्यानेही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना शहरातील सरगम कॉलनी येथे घडली आहे. मरिबा तुकाराम गायकवाड (७५) आणि चंद्रकांत मरिबा गायकवाड (४२) असे आत्महत्या केलेल्या बाप-लेकाची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी कि, चंद्रकांत मरिबा गायकवाड हे जालना येथे राज्य राखीव पोलीस दलात स्वयंपाकी म्हणून सेवेत होते. चार दिवसांपूर्वी सुटी घेऊन ते घरी आले. ते मागील काही दिवसांपासून आजारी होते. सोमवारी रात्री त्यांना सतत खोकल्याची उबाळी येत होती, यामुळे पत्नीला बोलून ते बाजूच्या खोलीत झोपण्यास गेले. आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास त्यांच्या खोलीचा दरवाजा उघडला तेव्हा चंद्रकांत यांनी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. ही माहिती त्यांच्या घरा शेजारी राहणा-या त्यांच्या वडिलांना समजली. तेव्हा ते चंद्रकांत याच्या खोलीत आले, थोडा वेळ तिथेच बसून राहिले व थोड्यावेळाने घरी गेले. यानंतर काही वेळाने त्यांनीही घरात आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.
घटनेची माहिती मिळताच नानलपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामराव गायकवाड, उपनिरीक्षक बाबुराव गिते, जमादार शेख उस्मान, गजानन गवळी यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला.या प्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक बाबुराव गिते, जमादार शेख उस्मान तपास करीत आहेत.