पाणीपुरवठा योजनेचे शुक्रवारी उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:05 IST2021-02-05T06:05:17+5:302021-02-05T06:05:17+5:30
पालम : १५ कोटी रुपये खर्च करून पालम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या डिग्रस बंधारा पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन ५ फेब्रुवारी ...

पाणीपुरवठा योजनेचे शुक्रवारी उद्घाटन
पालम : १५ कोटी रुपये खर्च करून पालम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या डिग्रस बंधारा पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन ५ फेब्रुवारी रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती आ. बाबाजानी दुर्राणी यांनी दिली.
पालम शहरातील गंगाखेड रस्त्यावरील माजी आ. सीताराम घनदाट यांच्या राष्ट्रवादी संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी ही माहिती देण्यात आली. यावेळी राकाँ प्रदेश उपाध्यक्ष सुरेशराव जाधव, तालुका अध्यक्ष वसंतराव सिरसकर, गजानन अंबोरे यांची उपस्थिती होती. आ. बाबाजानी दुर्राणी म्हणाले की, पंधरा कोटी रुपयांच्या पालम शहरातील नळ योजनेचे उद्घाटन होणार आहे. ते अनधिकृत असून शासनाकडून ते ५ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या नळ योजनेचे उद्घाटन पालकमंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते होणार असल्याचेही ते म्हणाले. यावेळी शहराध्यक्ष इमदाद पठाण, सोपान कुरे, मंचकराव पवार, रामजी कदम, सैफ चाऊस, कैलास रुद्रवार, शरद सिरस्कर, जिया पठाण, भय्या सिरस्कर, गौतम हत्तीअंबिरे, लाल खाँ पठाण, प्रभाकर सिरस्कर, संजय थिटे, विठ्ठल टोंपे, ज्ञानराज घोरपडे, राजेश शिंदे, दत्तराव घोरपडे, भारत पौळ, माणिक गायकवाड, राजेश वाघमारे रोहिनकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.