रोहित्र जळाल्याने खळी येथे पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:21 AM2021-09-14T04:21:45+5:302021-09-14T04:21:45+5:30

खळी गावातील आरोग्य उपकेंद्रासमोर असलेला गावठाणमधील विद्युत रोहित्र ९ सप्टेंबर रोजीच्या सायंकाळपासून बंद पडला. यामुळे गावातील सार्वजनिक पाणीपुरवठा योजना ...

Water scarcity at Khali due to burning of Rohitra | रोहित्र जळाल्याने खळी येथे पाणीटंचाई

रोहित्र जळाल्याने खळी येथे पाणीटंचाई

googlenewsNext

खळी गावातील आरोग्य उपकेंद्रासमोर असलेला गावठाणमधील विद्युत रोहित्र ९ सप्टेंबर रोजीच्या सायंकाळपासून बंद पडला. यामुळे गावातील सार्वजनिक पाणीपुरवठा योजना बंद असून ऐन सणासुदीच्या काळात गावात पाणीटंचाई निर्माण झाल्याने ग्रामस्थांना गावापासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या श्रीहरी नागोराव सोन्नर यांच्या शेतातील विहिरीवरून पाणी आणावे लागत आहे. तसेच गणेशोत्सव, श्री लक्ष्मी उत्सवाचे सण अंधारात साजरे करावे लागत आहेत.

टँकरने पाणीपुरवठा

ऐन सणासुदीच्या काळात गावात पाणीटंचाई निर्माण झाल्याने पाण्यासाठी ग्रामस्थांची होणारी पायपीट पाहून गावातील उत्तम रंगराव पवार यांनी १२ सप्टेंबर रोजी ग्रामस्थांना टँकरने पाणीपुरवठा केला. मात्र ऐन सणासुदीच्या काळात गावात निर्माण झालेल्या परिस्थितीकडे गावातील सरपंच व अन्य राजकीय पुढाऱ्यांसह शासकीय अधिकाऱ्यांनी ही दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांतून संताप व्यक्त केले जात आहे.

Web Title: Water scarcity at Khali due to burning of Rohitra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.