जॅकवेलमधील बिघाडामुळे पाणीटंचाईचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:17 AM2020-12-06T04:17:58+5:302020-12-06T04:17:58+5:30

पूर्णा : पाणीपुरवठा करणाऱ्या जॅकवेलमध्ये यांत्रिकी बिघाड झाल्यामुळे शहरावर पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. या कारणामुळे पुढील दहा दिवस ...

Water scarcity due to breakdown in Jackwell | जॅकवेलमधील बिघाडामुळे पाणीटंचाईचे सावट

जॅकवेलमधील बिघाडामुळे पाणीटंचाईचे सावट

Next

पूर्णा : पाणीपुरवठा करणाऱ्या जॅकवेलमध्ये यांत्रिकी बिघाड झाल्यामुळे शहरावर पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. या कारणामुळे पुढील दहा दिवस पुर्णेकरांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे.

शहरालगत असलेल्या पूर्णा नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्यातून पूर्णा शहराला पाणीपुरवठा केला जातो. मागील काही दिवसांपूर्वी पाणीपुरवठा करणाऱ्या जॅकवेलमधील ७५ अश्वशक्ती असलेल्या मोटारीच्या फुटबॉल असेम्बलीमध्ये बिघाड झाला आहे. ज्यामुळे पाच दिवसांपासून शहरातील पाणीपुरवठा बंद झाला आहे. दुरुस्तीसाठी पालिकेचे कर्मचारी रात्रंदिवस प्रयत्न करीत आहेत. या बिघाड दुरुस्त करण्यासाठी पालिका प्रशासनाच्या वतीने तज्ज्ञांना पाचारण करण्यात येणार असल्याचे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पाणीटंचाईबाबत नगरपालिकेच्या वतीने बुधवारी एक प्रसिद्धीपत्रक काढण्यात अले आहे. यामध्ये जॅकवेलमधील दुरुस्ती कामास अवधी लागणार असल्याने शहराचा पाणीपुरवठा पुढील दहा दिवस बंद राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील सार्वजनिक हातपंपाची दुरुस्ती करण्यात आली असून, नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title: Water scarcity due to breakdown in Jackwell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.