पालम तालुक्यातील डिग्रस बंधाऱ्यात यावर्षी ४७ दलघमी पाणीसाठा असल्याने पात्र काठोकाठ तुडूंब भरले होते. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात पाणी नेण्यात आले आहे. त्यामुळे पुढील उन्हाळाभर पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. १५ फेब्रुवारी रोजी पहाटे ५ वाजता दरवाजा क्रमांक ११ उघडून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. टप्पा- टप्पाने ८ दरवाजे उघडले गेले. सोमवारी दुपारी १२ :३० पर्यंत वाजेपर्यंत पाण्याचा विसर्ग सुरू होता. यावेळी स्थानिकांचा विरोध होऊ नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पाणी सोडताना उपविभागीय पोलीस अधीकारी सुभाष राठोड, कार्यकारी अभियंता एन. पी. गव्हाणे, शाखा अभियंता पी. जी. कदम, तहसीलदार प्रतिभा गोरे, पोलीस निरीक्षक दीपक शिंदे, उपअभियंता व्ही. डी. स्वामी आदींची उपस्थिती होती.
डिग्रस बंधाऱ्यातून नांदेडला सोडले पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:18 IST