शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

परभणीवर 'जलसंकट'! १४ कोटींच्या थकबाकीसाठी महावितरणने तोडला मनपाचा वीज पुरवठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 20:07 IST

कारेगाव, रहाटी आणि धर्मापुरीचे पंप झाले बंद; २६ जानेवारीपर्यंत पाणी मिळणं कठीण.

परभणी: परभणीकरांसाठी एक अत्यंत चिंताजनक बातमी समोर आली आहे. महापालिकेने विजेची थकबाकी न भरल्यामुळे महावितरणनेपाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख केंद्रांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. यामुळे येत्या २६ जानेवारीपर्यंत शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत होण्याची चिन्हे असून, शहरवासीयांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.

काय आहे नेमके प्रकरण? परभणी शहराला येलदरी धरणातून पाणीपुरवठा केला जातो. हे पाणी रहाटी, कारेगाव आणि धर्मापुरी येथील जलशुद्धीकरण केंद्रात आणून तिथून शहराच्या विविध भागांतील जलकुंभांमध्ये सोडले जाते. मात्र, या चारही ठिकाणच्या वीज देयकांचे तब्बल १४ कोटी रुपये महानगरपालिकेने महावितरणला दिलेले नाहीत. वारंवार सूचना देऊनही थकबाकी न भरल्याने अखेर शुक्रवारी महावितरणने कठोर पाऊल उचलत वीजपुरवठा खंडित केला.

४ दिवस पाणी मिळण्याची शक्यता धूसर शुक्रवारी वीज तोडल्यामुळे शनिवारी आणि रविवारी बँकांचे कामकाज बंद असल्याने महानगरपालिकेकडून तातडीने निधीची तरतूद होणे अशक्य दिसत आहे. सोमवार २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाची सुटी असल्याने, तोपर्यंत वीज जोडणी पूर्ववत होण्याची शक्यता कमी आहे. याचा अर्थ किमान सोमवारपर्यंत शहरातील नळ कोरडेच राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

जनतेत संतापाची लाट महापालिका आणि महावितरण या दोन शासकीय यंत्रणांच्या वादात सामान्य जनतेला का वेठीस धरले जात आहे, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. आधीच विस्कळीत असलेल्या पाणीपुरवठ्याला आता 'शॉर्ट सर्किट' लागल्याने परभणीकरांचे हाल होणार आहेत. आता लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यातून काय मार्ग काढतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Parbhani Faces Water Crisis: Power Cut Due to Unpaid Bills

Web Summary : Parbhani faces a severe water crisis as the power supply to key water plants was cut due to 14 crore in unpaid electricity bills. Water supply disruptions are expected until January 26th, impacting residents.
टॅग्स :Parbhani Municipal Corporationपरभणी महानगरपालिकाWaterपाणीmahavitaranमहावितरण