शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
4
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
5
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
6
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
7
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
8
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
9
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
10
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
11
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
13
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
14
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
15
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
16
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
17
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
18
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
19
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
20
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
Daily Top 2Weekly Top 5

खराब रस्त्याने घेतला बळी; वेळेवर उपचार न मिळाल्याने वृद्ध महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 18:48 IST

Bad roads took women's life : मोठ्या प्रयत्नाने गावातील तरुण मुलांना सोबत घेऊन त्यांनी जीप चिखलातून तीन किलोमीटर बाहेर काढत जिंतूर गाठले.

जिंतूर ( परभणी ) : रस्त्याअभावी पिंप्राळा येथील ६५ वर्षीय आजारी वृद्ध महिलेचा वेळेवर उपचार न मिळाल्याने  मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी ( दि. ११ ) घडली. आठ दिवसांपूर्वीच गर्भवती महिलेस उपचारासाठी तीन किलोमीटर पायी प्रवास करावा लागल्याची घटना ताजी असतानाच ही दुर्दैवी घटना घडल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे. 

मागच्या आठवड्यात पिंप्राळा गावातील एका गर्भवती महिलेस माळरानातील चिखलाचा रस्ता तुडवत तीन किलोमीटर पायी चालत यावे लागले. या घटनेने संपूर्ण जिल्हा आवाक् झाला होता. लोकमतने यासंदर्भात वृत्त प्रकाशित केल्यानंतर प्रशासनाने रस्त्याचे काम तातडीने हाती घेऊ असे आश्वासनही दिले होते. या घटनेची चर्चा सुरुच असताना याच गावातील पार्वतीबाई महादु ढाकरे  या ६५ वर्षीय वृध्द महिलेला शुक्रवारी ( दि. ९ ) रात्री झोपेत असताना अर्धांगवायूचा झटका आला. परंतु, दोन दिवस पाऊस सुरु असल्याने रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली होती. त्यामुळे गावात वाहन येणे शक्य नव्हते. 

पार्वतीबाई यांची प्रकृती खालावत असल्याने गावातील भीमराव ढाकरे यांनी जीपमधून त्यांना उपचारासाठी नेण्याचे ठरवले. मोठ्या प्रयत्नाने गावातील तरुण मुलांना सोबत घेऊन त्यांनी जीप चिखलातून तीन किलोमीटर बाहेर काढत जिंतूर गाठले. तेथून पुढे सुलतानपुर (जि.बुलडाणा) येथे खाजगी दवाखान्यात त्यांना नेण्यात आले. येथे डॉक्टरांनी तपासून आता उपचारासाठी उशीर झाला असून औषधउपचार करणे शक्य असल्याचा अभिप्राय दिला. यामुळे नातेवाईकांनी पुन्हा परतीचा प्रवास करत  पार्वतीबाईला यांना गावी आणले. यानंतर रविवारी (ता.११) सकाळी त्यांचा मृत्यू झाला.

टॅग्स :Deathमृत्यूparabhaniपरभणी