भाजी विक्रेते हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:16 IST2021-04-11T04:16:48+5:302021-04-11T04:16:48+5:30
रस्त्याची दुरवस्था परभणी : तालुक्यातील ब्राह्मणगाव फाटा ते सोन्ना या ५ ते ६ किमी अंतराची दुरवस्था झाली आहे. हा ...

भाजी विक्रेते हैराण
रस्त्याची दुरवस्था
परभणी : तालुक्यातील ब्राह्मणगाव फाटा ते सोन्ना या ५ ते ६ किमी अंतराची दुरवस्था झाली आहे. हा रस्ता अनेक ठिकाणी उखडला असून, ग्रामस्थांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. दुरुस्तीची मागणी होत आहे.
भाजी मंडई नावालाच
परभणी : येथील क्रांती चौकातील भाजी मंडई परिसरात भाजी विक्रीसाठी सुविधा करण्यात आली आहे. मात्र, ग्राहकांकडून भाजीमंडईकडे पाठ फिरविली जाते. त्यामुळे रस्त्याच्या कडेला थांबून विक्री वाढली आहे.
पुलांची कामे रखडली
परभणी : येथील जिंतूर रस्त्यावरील पुलांची कामे मागील अनेक दिवसांपासून रखडली आहेत. त्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागतो. कंत्राटदाराने येत्या पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण करावीत, अशी मागणी होत आहे.
गुटख्याची सर्रास विक्री
परभणी : जिल्ह्यात बंदी असलेल्या गुटख्याची सर्रास विक्री होत आहे. पानस्टॉल्स आणि किराणा दुकानातूनही हा गुटखा विक्री होत आहे. पोलीस प्रशासनाच्या कारवायांचा परिणाम होत नाही.