जिल्ह्यात लसीकरण मोहीम जोरात सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:21 IST2021-02-25T04:21:10+5:302021-02-25T04:21:10+5:30

कोरोना संसर्गाचा प्रतिबंध करण्यासाठी लस उपलब्ध झाल्यानंतर सुरुवातीच्या काही दिवसांत अत्यल्प प्रतिसाद मिळाला. मात्र मागच्या काही दिवसांपासून या लसीकरणासाठी ...

Vaccination campaign in full swing in the district | जिल्ह्यात लसीकरण मोहीम जोरात सुरू

जिल्ह्यात लसीकरण मोहीम जोरात सुरू

कोरोना संसर्गाचा प्रतिबंध करण्यासाठी लस उपलब्ध झाल्यानंतर सुरुवातीच्या काही दिवसांत अत्यल्प प्रतिसाद मिळाला. मात्र मागच्या काही दिवसांपासून या लसीकरणासाठी नागरिक पुढे येत आहेत. सध्या आरोग्य कर्मचारी आणि कोरोना योद्ध्यांना लस दिली जात आहे.

महानगरपालिकेच्या जायकवाडी परिसरातील रुग्णालयात असलेल्या कोरोना लसीकरण केंद्राला २४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजता भेट दिली तेव्हा १५ ते २० नागरिक लसीकरणासाठी रांगेत असल्याचे दिसून आले.

मनपाच्या केंद्रावरच आतापर्यंत सर्वाधिक लसीकरण झाले असून, या केंद्रावर लसीकरणासाठी गर्दी होत आहे. त्यामुळे मनपाची लसीकरण मोहीम जोरात असल्याचे या पाहणीत दिसून आले.

आतापर्यंत ६१ टक्के लसीकरण

जिल्ह्यात साधारणत: १४ हजार नागरिकांनी लसीकरणासाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी ८ हजार ५५६ नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यात आरोग्य कर्मचारी आणि कोरोना योद्ध्यांचा समावेश आहे. जवळपास ६१ टक्के लसीकरण आतापर्यंत पूर्ण झाले आहे.

लस घेतल्यानंतर...

मनपाच्या जायकवाडी येथील रुग्णालयात लसीकरण कक्षाच्या बाजूसच निरीक्षण कक्ष तयार केला आहे. या ठिकाणी लस घेतल्यानंतर ३० मिनिटांपर्यंत कर्मचारी थांबले होते. वैद्यकीय अधिकारी या लाभार्थ्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून असल्याचे यावेळी केलेल्या पाहणीत दिसून आले.

जिल्ह्यातील सर्व प्रमुख अधिकाऱ्यांनी कोरोनाची लस घेतल्याने आता या लसीकरण मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मागच्या काही दिवसांच्या तुलनेत लसीकरणाचा वेग वाढला आहे. येत्या एक-दोन दिवसात उद्दिष्ट पूर्ण होईल, अशी आशा आहे.

- महेश वडदकर, निवासी उपजिल्हाधिकारी, परभणी

जिल्ह्यातील लसीकरण केंद्रे आणि लसीकरण

१ सेलू १२६३

२परभणी मनपा १५०७

३ सिव्हिल ६६५

४गंगाखेड ६३८

५जिंतूर ७८९

६मानवत ५६६

७पाथरी ६६०

८पालम ५४२

Web Title: Vaccination campaign in full swing in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.