भीमजयंतीनिमित्त आज लसीकरण शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:17 IST2021-04-09T04:17:52+5:302021-04-09T04:17:52+5:30

येथील ज्योतिर्गमय इंग्लिश स्कूल येथे हे शिबिर होणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद टाकसाळे यांच्याहस्ते शिबिराचे ...

Vaccination camp today on the occasion of Bhim Jayanti | भीमजयंतीनिमित्त आज लसीकरण शिबिर

भीमजयंतीनिमित्त आज लसीकरण शिबिर

येथील ज्योतिर्गमय इंग्लिश स्कूल येथे हे शिबिर होणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद टाकसाळे यांच्याहस्ते शिबिराचे उद्‌घाटन होणार असून, याप्रसंगी महापौर अनिताताई सोनकांबळे, पूज्य भदंत मुदितानंद थेरो, अन्न व औषधी प्रशासनचे सहायक आयुक्त बळीराम मरेवाड, डाॅ. प्रकाश डाके, डाॅ. बी. टी. धुतमल, जिल्हा कोषागार अधिकारी ज्योती बगाटे, शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे, माजी सभापती रवींद्र सोनकांबळे, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सिद्धार्थ हत्तीअंबिरे, ज्योतिर्गमय इंग्लिश स्कूलच्या संचालिका प्रिया ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती राहाणार आहे. ४५ वर्षांवरील नागरिकांनी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जयंती समितीचे अध्यक्ष पंकज खेडकर, उपाध्यक्ष आर. एन. मस्के, सचिव दिलीप मालसमिंदर, कोषाध्यक्ष सुरेंद्र भालेराव, मिलिंद ढाले, सुजीत धावरे, डॉ. संजय मोहाडे आदींनी केले आहे.

Web Title: Vaccination camp today on the occasion of Bhim Jayanti