शेळगाव रस्त्याच्या कामात काळ्या मातीचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:16 IST2021-02-07T04:16:40+5:302021-02-07T04:16:40+5:30
५९ दिवस उपोषण करूनही रस्ते सुधारेणात सोनपेठ येथील नागरिकांनी तालुक्यातील रस्त्यांमध्ये सुधारणा व्हावी यासाठी तब्बल ५९ दिवस उपोषण केले ...

शेळगाव रस्त्याच्या कामात काळ्या मातीचा वापर
५९ दिवस उपोषण करूनही रस्ते सुधारेणात
सोनपेठ येथील नागरिकांनी तालुक्यातील रस्त्यांमध्ये सुधारणा व्हावी यासाठी तब्बल ५९ दिवस उपोषण केले होते. तरीही तालुक्यातील रस्ते काही सुधारले नाहीत. त्यातच सध्या परभणी - उमरी- भारसवाडा- शेळगावमार्गे सोनपेठ हद्दीपर्यंत रस्त्याचे खोदकाम सुरू आहे. या रस्त्यावर मुरूम अंथरण्याचे काम सुरू आहे; परंतु या रस्त्यावर मुरूम अंथरत असताना पाणी टाकले जात नाही. त्यामुळे रस्त्यावर धुळीचे लोट पसरत आहेत. याचा त्रास वाहनधारकांना होत आहे, तसेच हे काम तालुक्यातील दहीखेड शिवारापर्यंत आले असून, या ठिकाणी रस्त्याच्या भरावासाठी चक्क काळ्या मातीचा वापर केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या रस्त्याच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी या रस्त्याच्या गुणवत्तेवर लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.