नरसी मूकबधीर शाळेची मान्यता रद्द

By Admin | Updated: January 29, 2015 15:05 IST2015-01-29T15:05:20+5:302015-01-29T15:05:20+5:30

नरसी येथील निवासी मूकबधीर शाळेची मान्यता २८ जानेवारीपासून रद्द करण्याचे आदेश समाजकल्याण विभागाच्या लातूर विभागाचे प्रादेशिक उपायुक्त माधव वैद्य यांनी दिले आहेत.

Unrecognized school admission | नरसी मूकबधीर शाळेची मान्यता रद्द

नरसी मूकबधीर शाळेची मान्यता रद्द

अनुराग पोवळे ल्ल /नांदेड
नरसी येथील निवासी मूकबधीर शाळेची मान्यता २८ जानेवारीपासून रद्द करण्याचे आदेश समाजकल्याण विभागाच्या लातूर विभागाचे प्रादेशिक उपायुक्त माधव वैद्य यांनी दिले आहेत. वैद्य यांनी २७ रोजी सदर शाळेला भेट दिली होती. तसेच या शाळेची मान्यता काढण्याचा प्रस्ताव जि. प. समाजकल्याण विभागाने पाठविला होता.
नरसी येथील या निवासी मूकबधीर शाळेत एका सहावीत शिकणार्‍या मतीमंद मुलीवर शाळेत कार्यरत ३ शिपायांसह अन्य २ विद्यार्थ्यांनी गेल्या वर्षभरापासून अत्याचार केला होता. ही बाब पीडित मुलीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यानंतर उघडकीस आली होती. याप्रकरणी २४ जानेवारी रोजी पोलिसांनी गुन्हे दाखल केले. या गंभीर प्रकाराची दखल घेत नांदेड जि. प. समाजकल्याण विभागाने जय मल्हार शिक्षण प्रसारक मंडळ, सावरगाव पीर ता. मुखेड संचलित नरसीतील सदर शाळेची मान्यता काढण्याचा प्रस्ताव शासनाला सादर केला होता. त्या अहवालानुसार सदर शाळेची मान्यता २८ जानेवारी २0१४ पासून काढण्यात आली आहे. या शाळेतील चंद्रकांत संभाजी बरमे, देवीदास पिकले आणि मुजीब शहाजीर या कर्मचार्‍यांविरूद्ध तसेच शाळेतीलच अन्य दोन विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. 
मान्यता काढल्यामुळे या शाळेतील मुलांची यादी करून दुसर्‍या शाळेत प्रवेश देण्यासाठी प्रस्ताव पाठविण्याच्या सूचनाही नांदेड जि. प. समाजकल्याण विभागाला दिल्या आहेत. तसेच या संस्थेशी कोणताही प्रशासकीय अथवा आर्थिक व्यवहार आपल्या स्तरावरून करू नये अशी सूचना दिली आहे. 
दरम्यान, या गंभीर घटनेमुळे जिल्ह्यातील अपंग शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

 ■ या शाळेची मान्यता काढताना समाजकल्याण विभागाच्या प्रादेशिक आयुक्तांनी अनेक गंभीर बाबी पुढे आणल्या आहेत. त्यात सदर शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे असले तरी त्यातील डाटा मात्र नष्ट केल्याचे अहवालात नमूद केले आहे. त्याहूनही गंभीर म्हणजे सदर प्रकरण १ वर्षापासून चालू असताना शाळेच्या संस्थाचालकांनी सुरक्षा विषयक बाबीची दखल घेतली नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. समाजकल्याण विभागाने वारंवार सूचना देवूनही मुलींच्या संरक्षणासाठी महिला कर्मचार्‍यांची नियुक्ती केली नाही आणि मुलींचे संगोपन करण्यास सदर संस्था अकार्यक्षम असून शाळेची इमारतही योग्य नसल्याचे कारण दिले आहे.

 केवळ चार दिवसांत कारवाईचा बडगा
नरसी येथील निवासी मूकबधीर विद्यालयात जवळपास वर्षभरापासून सुरू असलेला हा गंभीर प्रकार २४ जानेवारी रोजी उघडकीस आला होता. लोकमतने या घटनेतील अनेक बाबी पुढे आणल्या. शनिवारीच समाजकल्याण विभागाचे वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता मारोती जाधवर यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. तसेच पीडित मुलीशीही चर्चा केली. २६ जानेवारी रोजी रविवारी समाजकल्याण अधिकारी सुनील खमीतकर यांनी पीडित मुलीची भेट घेतली. तर २७ जानेवारी रोजी समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त माधव वैद्य यांनीही घटनस्थळावर जावून माहिती घेतली. २८ जानेवारीपासूनच शाळेची मान्यता रद्द करण्याचे आदेशही धडकले आहेत. 

 

Web Title: Unrecognized school admission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.