स्थानिकांच्या भूमिकेमुळे बिनविरोध निवड शक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:21 IST2021-02-25T04:21:05+5:302021-02-25T04:21:05+5:30
पाथरी: पाथरी गटातून आपली निवड बिनविरोध होऊ नये, यासाठी जिल्हा पातळीवर बरेच प्रयत्न झाले. मात्र शेतकऱ्यांच्या हितासाठी स्थानिक पातळीवर ...

स्थानिकांच्या भूमिकेमुळे बिनविरोध निवड शक्य
पाथरी: पाथरी गटातून आपली निवड बिनविरोध होऊ नये, यासाठी जिल्हा पातळीवर बरेच प्रयत्न झाले. मात्र शेतकऱ्यांच्या हितासाठी स्थानिक पातळीवर झालेल्या निर्णयामुळे माझी जिल्हा बँकेवर बिनविरोध निवड झाल्याचे प्रतिपादन आ. बाबाजानी दुर्राणी यांनी केले. पाथरी येथील बाजार समितीच्या वतीने आ. बाबाजानी दुर्राणी यांची जिल्हा बँकेवर संचालक पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्याच्या नागरी सत्काराचे २४ फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर मदनराव भोसले, चक्रधर उगले, बाजार समितीचे सभापती अनिल नखाते, माधवराव जोगदंड, सुभाष कोल्हे, गंगाधर गायकवाड, प्रभाकर शिंदे, नारायण आढाव, दादासाहेब टेंगसे, अशोक गिराम, तुकाराम जोगदंड, सदाशिव थोरात, एकनाथ शिंदे, दत्ता मांयदळे, बालासाहेब कोल्हे यांची उपस्थिती होती. बँक शेतकऱ्यांचे आहे शेतकऱ्यांना पतपुरवठा करतांना पक्षपात झाला नाही पाहिजे यासाठी आपण प्रयत्नशील राहू, तसेच बँकेत सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आ. बाबाजानी दुर्रानी म्हणाले. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.