शहरातील रेल्वेस्थानकाजवळील साखला प्लॉट भागातील शेख सोनू उर्फ शेख अमीर शेख ताहेर हा चरस गांजा या पदार्थांची विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सहायक पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्यासह पथकातील कर्मचारी साखला प्लॉट भागात दाखल झाले. यावेळी शेख सोनू याच्या घराची झडती घेतली असता ३११ ग्रॅम चरस, ५०० ग्रॅम गांजा मिळून आला. त्याचप्रमाणे आरोपीच्या चारचाकी वाहनातून एक गावठी पिस्तूल आणि १३ जिवंत काडतूस तसेच बुलेट गाडीचा डिक्कीतून एक गावठी पिस्तूल जप्त पोलिसांनी जप्त केले आहे. या कारवाईत एकूण ३ आरोपींकडून ६ लाख ४१ हजार ८०८ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई पोलिस अधीक्षक जयंत मीना, अप्पर पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस अधीक्षक अविनाश कुमार, पोलीस निरीक्षक व्यंकटेश आलेवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक गूलाब बाचेवाड, उपनिरीक्षक चंद्रकांत पवार, संतोष शिरसेवाड, विश्वास खोले, साईनाथ पुयड, कर्मचारी सुग्रीव केंद्रे, हनुमंत जक्केवाड, निलेश भुजबळ, मधुकर चट्टे, बालासाहेब तुपसुंदर, बबन शिंदे, शंकर गायकवाड, अझहर पटेल, हरिचंद्र खूपसे, दिलावर खान पठाण, दीपक मुदीराज, यशवंत वाघमारे, सय्यद मोबीन, शेख अजहर जाफर, संतोष सानप, संजय घुले, छगन सोनवणे, अरुण कांबळे, विष्णू भिसे, आशा सावंत, उमा पाटील आदींच्या पथकाने केली आहे. परभणीत चरस, गांजा आणि पिस्तूल जप्त केल्याने खळबळ उडाली आहे.
परभणीत चरस, गांजासह दोन गावठी पिस्तूल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:19 IST