मानवत येथे दोन ट्रकची समोरासमोर धडक, चालक गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2017 18:19 IST2017-12-12T18:19:11+5:302017-12-12T18:19:22+5:30
मानवत (परभणी) : दोन ट्रकची समोरासमोर धडक बसल्याची घटना मानवत तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग २२२ वरील रत्नापूर शिवारात ११ डिसेंबर ...

मानवत येथे दोन ट्रकची समोरासमोर धडक, चालक गंभीर जखमी
मानवत (परभणी) : दोन ट्रकची समोरासमोर धडक बसल्याची घटना मानवत तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग २२२ वरील रत्नापूर शिवारात ११ डिसेंबर रोजी रात्री अकराच्या सुमारास घडली. यामध्ये दोन्ही वाहनांचे चालक गंभीर जखमी झाले आहेत़
मानवत येथून ११ डिसेंबर रोजी रात्री ११ च्या सुमारास एमएच ०४- ९५२९ हा ट्रक अमरावतीकडे साखरेचे पोते घेऊन जात होता़ तर परभणी येथून एमए २६-७७११ हा ट्रक जात होता़ ही दोन्ही वाहने मानवत तालुक्यातील महामार्ग २२२ वरील रत्नापूर शिवारामध्ये आले असता समारोसमोर धडकले़ या अपघातामध्ये दोन्ही वाहनांचे चालक गंभीर जखमी झाले़ तसेच ट्रकचेही नुकसान झाले आहे़ अपघाताची माहिती मिळताच सपोनि किरण पवार, दीपक वाव्हुळे, खरात यांनी घटनास्थळी भेट दिली़ १२ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत या संदर्भात पोलीस ठाण्यामध्ये नोंद झाली नव्हती.