शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत चरस, गांजासह दोन गावठी पिस्तूल जप्त; तिघे अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 12:52 IST

Crime News शहरातील रेल्वेस्थानकाजवळील साखला प्लॉट भागात पोलिसांची कारवाई

ठळक मुद्देएकूण ३ आरोपींकडून ६ लाख ४१ हजार ८०८ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. 

परभणी : शहरातील साकला प्लॉट भागात २३ फेब्रुवारील मोठी कारवाई केली असून, एका आरोपीच्या ताब्यातून चरस, गांजासह दोन गावठी पिस्तुल आणि तेरा जिवंत काडतूस जप्त केली आहेत. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.

शहरातील रेल्वेस्थानकाजवळील साखला प्लॉट भागातील शेख सोनू ऊर्फ शेख अमीर शेख ताहेर हा चरस गांजा या पदार्थांची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे साहाय्यक पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्यासह पथकातील कर्मचारी साखला प्लॉट भागात दाखल झाले. यावेळी शेख सोनू याच्या घराची झडती घेतली असता ३११ ग्रॅम चरस, ५०० ग्रॅम गांजा मिळून आला. त्याचप्रमाणे आरोपीच्या चारचाकी वाहनातून एक गावठी पिस्तूल आणि १३ जिवंत काडतूस तसेच बुलेट गाडीचा डिक्कीतून एक गावठी पिस्तूल जप्त पोलिसांनी जप्त केले आहे. या कारवाईत एकूण ३ आरोपींकडून ६ लाख ४१ हजार ८०८ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. 

ही कारवाई पोलीस अधीक्षक जयंत मीना, अप्पर पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, पोलीस निरीक्षक व्यंकटेश आलेवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक गुलाब बाचेवाड, उपनिरीक्षक चंद्रकांत पवार, संतोष शिरसेवाड, विश्वास खोले, साईनाथ पुयड, कर्मचारी सुग्रीव केंद्रे, हनुमंत जक्केवाड, नीलेश भुजबळ, मधुकर चट्टे, बाळासाहेब तुपसुंदर, बबन शिंदे, शंकर गायकवाड, अझहर पटेल, हरिचंद्र खूपसे, दिलावर खान पठाण, दीपक मुदीराज, यशवंत वाघमारे, सय्यद मोबीन, शेख अजहर जाफर, संतोष सानप, संजय घुले, छगन सोनवणे, अरुण कांबळे, विष्णू भिसे, आशा सावंत, उमा पाटील आदींच्या पथकाने केली आहे. परभणीत चरस, गांजा आणि पिस्तूल जप्त केल्याने खळबळ उडाली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीparabhaniपरभणी