नियम मोडणाऱ्यांकडून दोन लाखांचा दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:15 IST2021-05-30T04:15:55+5:302021-05-30T04:15:55+5:30
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने संचारबंदी लागू केली आहे. असे असतानाही नागरिक नियम मोडत घराबाहेर पडत आहेत. अशा नागरिकांविरुद्ध पोलिसांकडून ...

नियम मोडणाऱ्यांकडून दोन लाखांचा दंड वसूल
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने संचारबंदी लागू केली आहे. असे असतानाही नागरिक नियम मोडत घराबाहेर पडत आहेत. अशा नागरिकांविरुद्ध पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. २७ मे रोजी पोलीस प्रशासनाने विनामास्क फिरणाऱ्या ६०४ नागरिकांकडून १ लाख २० हजार ५० रुपयांचा दंड वसूल केला. त्याचप्रमाणे परवानगी नसतानाही दुकाने सुरू ठेवल्याप्रकरणी ३४ व्यापाऱ्यांकडून ५९ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. फिजिकल डिस्टन्सचे उल्लंघन करणाऱ्या ७६ वाहनधारकांकडून २६ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
दीड हजार नागरिकांच्या तपासणी
पोलीस प्रशासनाने दंडात्मक कारवाई करण्याबरोबरच वाहनधारकांची रॅपिड टेस्ट करण्याची मोहीमही हाती घेतली होती. या काळात जिल्ह्यात १ हजार ५३७ नागरिकांच्या तपासण्या करण्यात आल्या. नानलपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत १७०, नवामोंढा १५१, कोतवाली १६४, दैठणा २४, सेलू ९३, मानवत १७, पाथरी ११०, जिंतूर ३०, बोरी ७२, चारठाणा ८३, गंगाखेड ३००, पूर्णा ६० आणि पालम पोलीस ठाण्याच्या हद्दीत १२८ जणांची तपासणी करण्यात आली.