पाथरी-माजलगाव रस्त्यावर दुचाकी अपघातात दोघे जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 12:37 PM2020-01-30T12:37:48+5:302020-01-30T12:41:41+5:30

मध्यरात्री झालेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू

Two killed in a two-wheeler accident on Pathari-Majalgaon road | पाथरी-माजलगाव रस्त्यावर दुचाकी अपघातात दोघे जागीच ठार

पाथरी-माजलगाव रस्त्यावर दुचाकी अपघातात दोघे जागीच ठार

Next

पाथरी : माजलगावकडून दुचाकीवर परत येत असलेल्या दोघा जणांचा अपघातामध्येमृत्यू झाल्याची घटना 29 जानेवारी रोजी रात्री उशीरा पाथरी -माजलगाव रस्त्यावर घडली. मृतांमध्ये पाथरी तालुक्यातील किनोळा येथील दीपक कणसे आणि युवराज मगर या दोन तरुणांचा समावेश आहे

पाथरी तालुक्यातील वरखेड ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या किनोळा येथील दीपक अच्युतराव कनसे आणि युवराज सुभाषराव मगर हे दोघेजण दवाखान्याच्या कामानिमित्त बुधवारी ( दि. २९ ) सकाळी माजलगावकडे गेले होते.  रात्री माजलगावहून परत येत असताना त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. यात दोघेही जागीच ठार झाले. अपघातील मृत दीपक अच्युतराव कणसे हे वरखेड ग्रामपंचायतचे सदस्य होते. 

Web Title: Two killed in a two-wheeler accident on Pathari-Majalgaon road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.