घरगुती वादातून दोन भावांची तिसऱ्यास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:17 IST2021-03-27T04:17:41+5:302021-03-27T04:17:41+5:30

कारेगाव येथील प्रदीप पंढरीनाथ वावरे हे २२ मार्च रोजी रात्री १० वाजता घरासमोर उभे असताना त्यांचे भाऊ आप्पाराव पंढरीनाथ ...

Two brothers beat a third in a domestic dispute | घरगुती वादातून दोन भावांची तिसऱ्यास मारहाण

घरगुती वादातून दोन भावांची तिसऱ्यास मारहाण

कारेगाव येथील प्रदीप पंढरीनाथ वावरे हे २२ मार्च रोजी रात्री १० वाजता घरासमोर उभे असताना त्यांचे भाऊ आप्पाराव पंढरीनाथ वावरे व संदीप पंढरीनाथ वावरे हे तेथे आले. यावेळी आप्पाराव यांनी प्रदीप याच्याशी वाद घालून तु घराच्या संपत्तीमध्ये दखल का देतो, असे म्हणून लाकडी फळीने मारहाण सुरु केली. यावेळी अन्य एक भाऊ संदीप यानेही फायबरची लाठी आणून मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. हा वाद पाहून शेजारी बबन आश्रोबा वावरे व शेषराव रामराव वावरे यांनी येऊन सोडवा सोडव केली. त्यानंतर प्रदीप यांनी दवाखान्यात जाऊन उपचार घेतले. त्यानंतर शहरातील नवा मोंढा पोलीस ठाण्यात याबाबत २४ मार्च रोजी फिर्याद दिली. त्यावरून आप्पाराव पंढरीनाथ वावरे व संदीप पंढरीनाथ वावरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: Two brothers beat a third in a domestic dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.