परभणीत दोन मृतदेह आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 00:10 IST2018-10-15T00:09:26+5:302018-10-15T00:10:07+5:30
दोन दिवसांत परभणी शहरात दोन मृतदेह आढळले असून, दोन्ही मृतदेहांची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे.

परभणीत दोन मृतदेह आढळले
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : दोन दिवसांत परभणी शहरात दोन मृतदेह आढळले असून, दोन्ही मृतदेहांची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे.
अनोळखी मृतदेह आढळला
येथील रेल्वेच्या मेन गेटजवळ ११ आॅक्टोबर रोजी एका महिलेचा मृतदेह आढळला. साधारणत: ६५ वर्षे वयाची ही महिला असून, दीर्घ आजाराने तिचा मृत्यू झाला असावा़ ५ फुट उंची, काळा रंग, नाक पसरट, डोळे बारिक असे या महिलेचे वर्णन असून, तिच्या हाताच्या व पायाच्या बोटांना कुष्टरोग झाल्यासारखे दिसत आहे़ या महिलेविषयी माहिती असल्यास रेल्वे पोलीस चौकीत संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मो़ शफियोद्दीन यांनी केले आहे़
खानापूरजवळ मृतदेह
शहरातील खानापूर फाटा येथील कालव्याच्या पुलाच्या बाजुला एका व्यक्तीचा मृतदेह १३ आॅक्टोबर रोजी सकाळी ८़१५ च्या सुमारास आढळला़ या मृतदेहाची ओळख पोलिसांना पटलेली नाही़ सध्या हा मृतदेह जिल्हा रुग्णालयातील शीतगृहात ठेवला आहे़ साधारणत: ५ फुट ५ इंच उंचीचा, अंगात पांढरा चौकडा शर्ट व विटकरी रंगाची पँट असून, या वर्णनाच्या व्यक्तीविषयी कोणाला माहिती असल्यास नवा मोंढा पोलीस ठाण्यात व्हीक़े़ राठोड यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे़