न्यायालयाच्या आदेशाने दोन अर्ज वैध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:51 IST2021-01-08T04:51:17+5:302021-01-08T04:51:17+5:30
तालुक्यातील कळगाव येथील रेखा पंडित वाव्हुळे व ललिता रखमाजी गबाळे यांनी तालुक्यातील कळगाव ग्रामपंचायतीच्या वाॅर्ड क्र. २ मधून अनुक्रमे ...

न्यायालयाच्या आदेशाने दोन अर्ज वैध
तालुक्यातील कळगाव येथील रेखा पंडित वाव्हुळे व ललिता रखमाजी गबाळे यांनी तालुक्यातील कळगाव ग्रामपंचायतीच्या वाॅर्ड क्र. २ मधून अनुक्रमे ओबीसी व अनुसूचीत जाती प्रवर्गासाठी अर्ज केला होता. या अर्जासोबत जातपडताळणी समितीकडे जात दावा प्रलंबित असल्याचा पुरावा व जात प्रमाणपत्राची छायांकित प्रत जोडली होती; परंतु निर्वाचन अधिकाऱ्यांनी जात प्रमाणपत्राची छायांकित प्रत न जोडल्याच्या कारणावरून त्यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरविला होता. या निर्णयाविरुद्ध दोन्ही उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ॲड. शहाजी घाटोळ-पाटील यांच्यामार्फत याचिका दाखल केली होती. या याचिकेची सुनावणी न्यायमूर्ती रवींद्र व्ही. घुगे यांच्या समोर झाली. तांत्रिक मुद्यावर निर्वाचन अधिकाऱ्याने उमेदवारी अर्ज अवैध ठरविणे चुकीचे असल्याचे नमूद करीत दोन्ही उमेदवारी अर्ज वैध ठरवून स्वीकृत करण्याचे आदेश न्या. रवींद्र घुगे यांनी दिले.
दरम्यान, न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर त्या दोन्ही उमेदवारांचे अर्ज वैध ठरवण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार पल्लवी टेमकर यांनी दिली.