जिंतूरमध्ये अडीच लाखाचा अवैध गुटख्याचा साठा जप्त
By राजन मगरुळकर | Updated: October 27, 2023 20:13 IST2023-10-27T20:13:14+5:302023-10-27T20:13:32+5:30
दोन जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे

जिंतूरमध्ये अडीच लाखाचा अवैध गुटख्याचा साठा जप्त
परभणी : स्थानिक गुन्हा शाखा पथकाने गोपनीय माहितीवरून गस्त घालताना जिंतूर ठाण्याच्या हद्दीमध्ये शुक्रवारी अडीच लाखांचा अवैध गुटखा जप्त केला. यामध्ये दोन जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला.
स्थागुशा पथकाला अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी गस्त घालताना मिळालेल्या माहितीवरून, गुटख्याची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने एक जण वाहतूक करत असल्याचे समजले. त्यावरून सदरील इमसाच्या ताब्यातून दोन लाख ४८ हजार २१२ रुपयांचा गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला. सदरील गुटखा संबंधिताने सलमान पठाण (रा.मंठा, जालना) याच्याकडून विकत घेतल्याचे सांगितले. यावरून पोलिसांनी अक्षय उर्फ पप्पू शिवानंद थिटे (रा.धोबी गल्ली, जिंतूर) आणि सलमान पठाण या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक रागसुधा. आर., यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वसंत चव्हाण. पोलीस उपनिरीक्षक गोपीनाथ जाधव. पोलीस कर्मचारी विलास सातपुते, सिद्धेश्वर चाटे, नामदेव दुबे, राम पौळ, मधुकर ढवळे, आशा शेलाळे, संजय घुगे, बालाजी रेड्डी, गणेश कौटकर यांनी केली.