बाराशे महिला योजनेच्या लाभापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:18 IST2021-04-20T04:18:02+5:302021-04-20T04:18:02+5:30

केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने प्रधानमंत्री मातृ वंदना योजना राबविली जाते. दारिद्र रेषेखालील गर्भवती महिला गरोदरपणाच्या ...

Twelve hundred women deprived of the benefits of the scheme | बाराशे महिला योजनेच्या लाभापासून वंचित

बाराशे महिला योजनेच्या लाभापासून वंचित

केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने प्रधानमंत्री मातृ वंदना योजना राबविली जाते. दारिद्र रेषेखालील गर्भवती महिला गरोदरपणाच्या काळातही मजुरीची कामे करतात. अशा परिस्थितीत या महिला व त्यांच्या बालकांवर आरोग्याचा विपरित परिणाम होऊ शकतो. हे टाळण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने मातृवंदना योजना राबविली जाते. मात्र, परभणी शहरात मागील एक वर्षापासून १,२०० लाभार्थी महिलांना या योजनेचा लाभ मिळाला नाही. सध्या कोरोनाचे संकट निर्माण झाले असून, अशा काळात महिला लाभापासून वंचित असल्याची बाब समोर आली आहे. तेव्हा या योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना तातडीने लाभ मंजूर करून द्यावा, अशी मागणी शिवसेनेच्या अंबिका डहाळे, तसेच गटनेते चंद्रकांत शिंदे यांनी महापालिकेच्या आरोग्य अधिकार्‍यांकडे केली आहे.

Web Title: Twelve hundred women deprived of the benefits of the scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.