मंजुराच्या घरातील तुरीचे पाेते चोरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:03 IST2021-02-05T06:03:46+5:302021-02-05T06:03:46+5:30
कुडा येथील यशवंत कोंडिबा पंडित हे शेतमजुरी व मळणी यंत्रावर काम करून उपजीविका भागवितात. त्यांनी मजुरीच्या माध्यमातून ३० किलो ...

मंजुराच्या घरातील तुरीचे पाेते चोरले
कुडा येथील यशवंत कोंडिबा पंडित हे शेतमजुरी व मळणी यंत्रावर काम करून उपजीविका भागवितात. त्यांनी मजुरीच्या माध्यमातून ३० किलो तूर जमविली होती. ही तूर एका पोत्यामध्ये ठेवून ते ३० जानेवारी रोजी कुटुंबीयांसह औरंगाबाद येथे नातेवाइकांकडे गेले होते. २ फेब्रुवारी रोजी ते दुपारी ४ वाजता घरी परतले असता, त्यांना त्यांच्या घराचा दरवाजा उघडा दिसला. आतमध्ये जाऊन पाहिल्यानंतर तुरीचे ३० किलोचे पोते गायब असल्याचे दिसून आले. या घरातील अन्य साहित्य मात्र जागेवरच होते.
शिवाय त्यांचे शेजारी गंगाधर लक्ष्मण पारवे यांच्या घरातील तुरीचे एक पोतेही गायब असल्याचे समजले. याबाबत त्यांनी माहिती घेतली असता, गजानन दत्तराव मुटकुळे हा गावात तूर विक्री करीत असल्याचे समजले. त्यानंतर यशवंत पंडित यांनी चारठाणा पोलीस ठाणे गाठून याबाबत पोलिसात फिर्याद दिली. त्यावरून बुधवारी याप्रकरणी आरोपी गजानन दत्तराव मुटकुळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.
विहिरीतील पाच एचपीची मोटार चोरली
परभणी : वन विभागाच्या जागेवरील विहिरीत बसविलेली ५ एचपीची इलेक्ट्रीक मोटार चोरट्याने चोरून नेल्याची घटना जिंतूर तालुक्यातील घेवंडा रोड भागात घडली.
याबाबत वनरक्षक ज्ञानोगा गणपती कांबळे यांनी जिंतूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, वन विभागाच्या जागेवर असलेल्या विहिरीतील ५ एचपीची मोटार गायब असल्याचे २९ जानेवारी रोजी दिसून आले.
तसेच सर्व्हिस वायरही कापून नेल्याचे पहावयास मिळाले. याबाबत त्यांनी जिंतूर पोलीस ठाण्यात २ फेब्रुवारी रोजी फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.