वृक्ष तोडीमुळे पर्यावरण चक्र बिघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:04 IST2021-02-05T06:04:48+5:302021-02-05T06:04:48+5:30

जिंतूर शहरातील ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या मागील बाजुस महसूल विभागाच्या मालकीच्या ४७ एकर जमिनीवर प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ३ हजार वृक्ष ...

Tree felling disrupted the environmental cycle | वृक्ष तोडीमुळे पर्यावरण चक्र बिघडले

वृक्ष तोडीमुळे पर्यावरण चक्र बिघडले

जिंतूर शहरातील ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या मागील बाजुस महसूल विभागाच्या मालकीच्या ४७ एकर जमिनीवर प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ३ हजार वृक्ष लागवडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी तहसीलदार मांडवगडे बोलत होते. व्यासपीठावर डॉ. दर्गादास कान्हडकर, प्रा. श्रीधर भोंबे, कपील फारुख, प्रशांत राखे, विजय घुगे, नागेश देशमुख, अनिल कांबळे यांची उपस्थिती होती. महसूल विभागाच्या ४७ एकर जमिनीवर वृक्ष लागवडी बरोबरच वृक्षासाठी पाण्याची व्यवस्था व वृक्ष लागवड क्षेत्रात तारेचे कुंपन करण्यासाठी महसूल विभाग प्रयत्नशील आहे. हा ड्रिम प्रकल्प मराठवाड्यासाठी मॉडेल बनावा,यासाठी प्रत्न असल्याचे तहसलदार मांडवगडे यांनी सांगितले. यशस्वीतेसाठी नारायण शिंदे, प्रा. मुंजाजी दाभाडे यांच्यासह झाड फाऊंडेशन, ज्ञानोपासक महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी उपस्थित होते.

Web Title: Tree felling disrupted the environmental cycle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.