परभणी जिल्ह्यातील चार तहसीलदारांच्या बदल्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 16:32 IST2018-08-24T16:31:49+5:302018-08-24T16:32:23+5:30

राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाने २३ ऑगस्ट रोजी मराठवाड्यातील तहसीलदारांच्या बदल्यांचा आदेश काढले असून, त्यात परभणी जिल्ह्यातील चार तहसीलदारांच्या बदल्या झाल्या आहेत.

Transfers of four tahsildars in Parbhani district | परभणी जिल्ह्यातील चार तहसीलदारांच्या बदल्या 

परभणी जिल्ह्यातील चार तहसीलदारांच्या बदल्या 

परभणी - राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाने २३ ऑगस्ट रोजी मराठवाड्यातील तहसीलदारांच्या बदल्यांचा आदेश काढले असून, त्यात परभणी जिल्ह्यातील चार तहसीलदारांच्या बदल्या झाल्या आहेत.

राज्य शासनाच्या महसूल वन विभागाचे सहसचिव एम.ए. गुट्टे यांनी 23 ऑक्टोबर रोजीहे आदेश काढले आहेत. त्यानुसार गंगाखेड येथील तहसीलदार आसाराम छडीदार यांची बदली सेलू येथे तहसीलदार पदी करण्यात आली आहे.   सेलूचे तहसीलदार स्वरूप कंकाळ यांची बदली गंगाखेड येथे करण्यात आली आहे. तसेच परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार विद्या शिंदे यांची बदली हिंगोली येथे सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी या पदावर करण्यात आली आहे परभणीचे सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी सखाराम मांडवगडे यांची बदली गेवराईचे तहसीलदार या पदावर झाली आहे.

या आदेशाद्वारे परभणी जिल्ह्याला दोन तहसीलदार मिळाले आहेत.  त्यात बीड येथील तहसीलदार मनिषा तेलभरे यांची बदली परभणी येथे महसूल सहाय्यक या पदावर झाली असून जालना जिल्ह्यातील परतूर येथील डी.डी. फुपाटे यांची बदली मानवतचे तहसीलदार म्हणून झाली आहे.

Web Title: Transfers of four tahsildars in Parbhani district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.