दहा गावातील शेतकऱ्यांना प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:04 IST2021-02-05T06:04:37+5:302021-02-05T06:04:37+5:30
तालुक्यातील बुक्तरवाडी, बोंदरगाव, विटा खुर्द, शिरोरी, निमगाव, वैतागवाडी, वाडी पिंपळगाव, वंदन आदी गावांमध्ये राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानअंतर्गत प्रत्येक गावातील ...

दहा गावातील शेतकऱ्यांना प्रशिक्षण
तालुक्यातील बुक्तरवाडी, बोंदरगाव, विटा खुर्द, शिरोरी, निमगाव, वैतागवाडी, वाडी पिंपळगाव, वंदन आदी गावांमध्ये राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानअंतर्गत प्रत्येक गावातील ३० शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये जमिनीच्या आरोग्य पत्रिकेनुसार खताची मात्रा कशा प्रकारची वापरायची, त्यामुळे जमिनीचा पोत चांगला राहील, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच ग्रामपंचायतीमध्ये पिकानुसार कशा प्रकारचे व कोणत्या प्रकारची खते वापरायची, याचे फलक लावण्यात आले. माती परीक्षण का करावे, माती परीक्षणाचे फायदे व माती परीक्षण कशा प्रकारे करावे, याचेही यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. यासाठी शास्त्रज्ञ म्हणून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे डॉ. आर. एन. खंदारे, शिवाजी साखरे, जयदीप शिरसाठ, सौरभ सापडे, एम. के. हर्षा यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमासाठी तालुका कृषी अधिकारी गणेश कोरेवाड, मंडल कृषी अधिकारी समीर वाळके यांच्यासह कृषी सहाय्यक यांनी प्रयत्न केले.