ट्रेलर-ट्रकमध्ये झालेल्या अपघाताने जालना- जिंतूर मार्गावरील वाहतूक ९ तास ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 14:54 IST2017-08-25T14:54:23+5:302017-08-25T14:54:52+5:30
सेलू तालुक्यातील देवगाव फाटा येथील करपरा नदीवरील पुलावर काल मध्यरात्री कंटेनर व ट्रमध्ये जोरदार अपघात झाला. यात ट्रक पुलावरच आडवा झाल्याने वाहतुकीला अडथला निर्माण झाला.

ट्रेलर-ट्रकमध्ये झालेल्या अपघाताने जालना- जिंतूर मार्गावरील वाहतूक ९ तास ठप्प
देवगावफाटा (जि. परभणी ), दि. २५ : सेलू तालुक्यातील देवगाव फाटा येथील करपरा नदीवरील पुलावर काल मध्यरात्री कंटेनर व ट्रमध्ये जोरदार अपघात झाला. यात ट्रक पुलावरच आडवा झाल्याने वाहतुकीला अडथला निर्माण झाला. रात्रीपासूनच जालना-जिंतूर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. अखेर सकाळी ९ वाजल्यानंतर महामार्ग पोलिसांच्या मदतीने मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात यश आले.
देवगाव फाटा शिवारातून वाहणा-या करपर नदीच्या पुलावर गुरूवारी रात्री १२ च्या सुमारास कंटेनर (एऩएल़ ०१ क्यू़ ९०३) व ट्रक ( एम़एच़ २७ सी़ ३७४) या दोन वाहनांमध्ये अपघात झाला़. अपघातानंतर कंटेनर पुलाच्या खाली कोसळला़ तर ट्रक पुलावर आडवा झाला़. ट्रक पुलावरच आडवा झाल्याने महामार्गावरील वाहतुक ठप्प झाली. दोन्ही बाजुंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या़. जवळपास तब्बल ९ तास वाहतुक ठप्प झाली. आज सकाळी ९ वाजता महामार्ग वाहतुक पोलिसांनी वाहतुक सुरळीत केली़. या अपघातात कंटेनरमधील दोघ जण किरकोळ जखमी झाले आहेत़