Timeless fasting of 'Swabhimani' in Parbhani | परभणीत ‘स्वाभिमानी’चे बेमुदत उपोषण

परभणीत ‘स्वाभिमानी’चे बेमुदत उपोषण

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : सोयाबीन व कापूस पीक विम्याची रक्कम देण्यात यावी तसेच दुधाला प्रति लिटर दरवाढ देण्यात यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शुक्रवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे़
जिल्ह्यात आॅक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते़ त्यानुसार शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ८ हजार रुपय शासनाने मदत जाहीर केली होती़ ही मदत जिल्ह्यातील बहुतांश शेतकºयांना मिळालेली नाही़ शेतकºयांनी पदरमोड करून पीकविमा भरला़ नुकसानीचे पंचनाम प्रशासनाने केले तरीही शेतकºयांना पीक विम्याची रक्कम मिळालेली नाही़ शिवाय किती दिवसात ती शेतकºयांना मिळणार, हेही जाहीर करण्यात आलेले नाही़ तसेच पश्चिम महाराष्ट्रात शासकीय दूधडेअरीचे दर प्रतिलिटर ३२ ते ३५ रुपये झालेले आहेत़ परभणी जिल्ह्यात मात्र २५ रुपये प्रति लिटर दूध दर आहेत़ दुसरीकडे राज्य शासन जिल्ह्यातील संकलित दूध खाजगी डेअरीला ३२ ते ३४ रुपये प्रतिलिटर दराने विकत आहे़ हा अत्यंत चुकीचा प्रकार असून, शेतकºयांना वाढीव दूध दर मिळावा, तसेच सोयाबीन व कापूस पीक विमा देण्यात यावा आदी मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हा कचेरीसमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले़ उपोषणात किशोर ढगे, भास्कर खटींग, भगवान शिंदे, मुंजाभाऊ लोंढे, दिगंबर पवार, सचिन झाडे, रामभाऊ आवरगंड, उस्मान पठाण, बाळासाहेब घाटूळ, हनुमान भरोसे, केशव आरमळ, संतोष पोते, रामप्रसाद गमे, माधव लोंढे, मुरलीधर जाधव आदींचा सहभाग आहे़

Web Title: Timeless fasting of 'Swabhimani' in Parbhani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.