थरारक ! पार्किगच्या वादातून थेट गोळीबार; कानापासून गोळी गेल्याने वाचला जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2020 05:05 PM2020-09-09T17:05:35+5:302020-09-09T17:08:32+5:30

घरासमोर कार लावली म्हणून झाली बाचाबाची

Thrilling! Live firing from a parking dispute; Survived by a bullet passes from the ear | थरारक ! पार्किगच्या वादातून थेट गोळीबार; कानापासून गोळी गेल्याने वाचला जीव

थरारक ! पार्किगच्या वादातून थेट गोळीबार; कानापासून गोळी गेल्याने वाचला जीव

Next
ठळक मुद्देजिवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या कलमांवरून गुन्हा नोंद या घटनेतील मुख्य आरोपी फरार आहेत़ 

पाथरी (जि़परभणी) : कमरेला लावलेली रिव्हॉल्वर (बंदूक) काढून थेट चेहऱ्यासमोर धरून फायर केली़ मात्र ही गोळी कानापासून गेल्याने समोरचा बालंबाल बचावला़ शहरातील अजीज मोहल्ला भागात ८ सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास हा फिल्मी स्टाईल प्रकार घडला़ या प्रकरणी आरोपीविरुद्ध पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून, पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत़ 

पाथरी शहरातील अजीज मोहल्ला परिसरात मंगळवारी रात्री ११़३० च्या सुमारास मोहम्मद बीन सईद बीन किलेब उर्फ चाऊस यांनी त्यांची कार (क्रमांक एमएच २१ सी-२३७४), सलाम बीन सालेन बीन हवेल यांच्या घरासमोर लावली़ याच कारणावरून बाचाबाची झाली़ या ठिकाणी गाडी लावू नका, असे म्हटल्यानंतर महम्मद बीन सईद बीन चाऊस यांनी शिवीगाळ करून कमरेला लावलेली रिव्हॉलव्हर काढली़ ही रिव्हॉलव्हर सालेम बीन यांच्या चेहरसमोर लावून फायर केला़ मात्र गोळी कानाच्या बाजुने निघून गेली, अशी तक्रार सालेम बीन यांनी पाथरी पोलीस ठाण्यात दिली आहे़ त्यावरुन आरोपी मोहम्मद बीन सईद बीन किलेब उर्फ चाऊस याच्याविरुद्ध शस्त्र कायदा तसेच जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या कलमांवरून गुन्हा नोंद झाला आहे़ या घटनेतील मुख्य आरोपी फरार आहेत़ 

दरम्यान, ९ सप्टेंबर रोजी पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आऱ रागसुधा, सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्यासह स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली़ पाथरी पोलिसांचे पथक आरोपीच्या घराची झडती घेण्यासाठी गेले असता, घरात जाण्यास रोखण्यात आले़ त्यानंतर पोलिसांनी महम्मद नवशाद अक्रम शेख यास हत्यारासह अटक केली आहे़ अटक केलेल्या आरोपी न्यायालयासमोर उभे केले असता, एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत जाधव यांनी दिली़

Web Title: Thrilling! Live firing from a parking dispute; Survived by a bullet passes from the ear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.