शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

परभणीत रंगला कुस्त्यांचा थरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 00:18 IST

जीवनज्योत चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने माजी खा़प्रा़ अशोकराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त येथील नूतन महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित निकाली कुस्ती स्पर्धेत चुरशीचे कुस्ती सामने पार पडले़ जिल्हाभरातील हजारो कुस्तीप्रेमींच्या उपस्थितीत कुस्त्यांचा थरार रात्री उशिरापर्यंत रंगत गेला़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जीवनज्योत चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने माजी खा़प्रा़ अशोकराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त येथील नूतन महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित निकाली कुस्ती स्पर्धेत चुरशीचे कुस्ती सामने पार पडले़ जिल्हाभरातील हजारो कुस्तीप्रेमींच्या उपस्थितीत कुस्त्यांचा थरार रात्री उशिरापर्यंत रंगत गेला़माजी खा़अशोकराव देशमुख यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सहा वर्षांपासून या स्पर्धा घेतल्या जात आहेत़ यंदाचे हे सातवे वर्षे असून, ४ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास स्पर्धला प्रारंभ झाला़ उपमहापौर माजू लाला यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले़ यावेळी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सिद्धार्थ हत्तीअंबिरे, तालुकाध्यक्ष पंजाबराव देशमुख, नगरसेवक गुलमीर खान, श्रीकांत विटेकर, आंतरराष्ट्रीय पंच बंकट यादव, आयोजक रविराज देशमुख आदींची उपस्थिती होती़ स्पर्धेसाठी लाल मातीचा आखाडा तयार करण्यात आला होता. प्रकाशझोतात ही स्पर्धा खेळविली जात असून, सायंकाळी स्पर्धा पाहण्यासाठी हजारो प्रेक्षक जिंतूर रोडवरील नूतन महाविद्यालयाच्या मैदानावर दाखल झाले होते़महाराष्ट्रातील नामवंत आखाड्यातील मल्ल परभणीत दाखल झाले होते. पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, कुर्डूवाडी आदी ठिकाणाहून स्पर्धक आले होते. राजस्तरासाठी १६ तर मराठवाडास्तरासाठी ३२ पहेलवान आणि खुल्या गटासाठी असे २५० पहेलवान सहभागी झाले होते. स्पर्धा पाहण्यासाठी परभणी जिल्ह्यातील कुस्तीप्रेमींनी गर्दी केली होती. प्रेक्षकांसाठी १२ पायºयांची गॅलरी बनविली होती.या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील शासकीय व प्रशासकीय अधिकाºयांसह राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक नामवंतांनी भेटी दिल्या़ शंकरअण्णा पुजारी यांच्या समालोचनामुळे स्पर्धेत मोठी रंगत निर्माण झाली होती. ओघवत्या शैलीतील कुस्ती स्पर्धेचे समालोचन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असल्याचे पहावयास मिळाले. कोल्हापूर येथील राजू आवळे यांचा पुतण्या रणवीर आवळे व संचाने हलगी, ढोलक, तयताळ व तुतारी या वाद्यांनी स्पर्धेच्या उत्साहात भर घातली.या स्पर्धेसाठी तयार करण्यात आलेल्या ६० बाय ६० चौरस फुटाचा लाल मातीचा आखाडा तयार केला होता. या आखाड्यावर स्पर्धा खेळविण्यात आली.गोकूळ आवारे, सागर बिराजदार यांच्यात अंतीम लढतनूतन महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित या निकाली कुस्ती स्पर्धेत रात्री १०़३० वाजता मराठवाडास्तरावरील अंतीम सामन्याला सुरुवात झाली तर या सामान्यानंतर राज्यस्तरासाठीचा अंतीम सामना खेळविला जाणार असल्याने रात्री उशिरापर्यंत या स्पर्धा चालल्या़मराठवाडास्तरासाठी पुणे येथील काका पवार तालीम संघाचा पहेलवान गोकूळ आवारे आणि पुणे येथीलच गोकूळ वस्ताद तालीम संघाचा पहेलवान सागर बिराजदार यांच्यात अंतीम सामना खेळविण्यात आला़ तर राज्यस्तरासाठी पुणे येथील काका पवार तालीम संघाचा ज्ञानेश्वर गोचडे आणि मामासाहेब लोहळ तालीम संघाचा खेळाडू अक्षय शिंदे यांच्यात अंतीम सामना खेळविण्यात येणार होता़तत्पूर्वी ५५ किलो वजन गटामध्ये परभणीचा राजेश कोल्हे प्रथम तर बीडचा दयानंद सलगर द्वितीय आला़ साठ किलो वजन गटात कोल्हापूर येथील भारत पाटील याने प्रथम तर लातूर येथील महेश सातपुते याने द्वितीय क्रमांक पटकावला़ ७६ किलो वजन गटामध्ये लातूरच्या विष्णू सातपुते याने प्रथम तर परभणीच्या सोमनाथ श्रीखंडे याने द्वितीय क्रमांक मिळविला़६७ किलो वजन गटात कोल्हापूर येथील हृदयनाथ पाचकुटे याने प्रथम तर परभणीचा पहेलवान अर्जुन डिघोळे याने द्वितीय क्रमांक मिळविला़ या स्पर्धेचा अंतीम निकाल रात्री उशिरापर्यंत हाती आला नाही़ स्पर्धेसाठी राज्यभरातून दाखलेल्या खेळाडुंना परभणीकर क्रीडा रसिकांनी उत्स्फूर्त दाद देत स्पर्धेतील रंगत वाढविली़