रविवारपर्यंत अवकाळी पावसाचा धोका कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:15 IST2021-05-30T04:15:48+5:302021-05-30T04:15:48+5:30
यावर्षीच्या उन्हाळ्यात वारंवार वातावरणात बदल होऊन अवकाळी पाऊस झाला आहे. मागच्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात अधून मधून हा पाऊस होत ...

रविवारपर्यंत अवकाळी पावसाचा धोका कायम
यावर्षीच्या उन्हाळ्यात वारंवार वातावरणात बदल होऊन अवकाळी पाऊस झाला आहे. मागच्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात अधून मधून हा पाऊस होत आहे. शुक्रवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने अनेक ठिकाणचे नुकसान झाले आहे. रविवारीदेखील जिल्ह्यात अवकाळी पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली. त्याचप्रमाणे ३१ मे रोजी औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, १ जूनरोजी औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, लातूर, जालना आणि नांदेड, तर २ जूनरोजी बीड, उस्मानाबाद, लातूर व नांदेड या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
जिल्ह्यात अवकाळी पाऊस होत असल्याने नागरिकांनी झाडाखाली थांबू नये, पशुधनास निवार्याखाली बांधावे, उघड्यावर किंवा झाडाखाली बांधू नये, असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्यावतीने करण्यात आले आहे.