शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

संध्याकाळी अटक केलेला खुनातील मुख्य आरोपी पहाटे झाला फरार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2022 3:14 PM

पोलिसांची वेगवेगळी पथके घेत आहेत शोध

मानवत (परभणी) : तालुक्यातील सोमठाणा येथील खून प्रकरणात शुक्रवारी संध्याकाळी अटक केलेला आरोपी आज पहाटे ५ वाजेच्या सुमारास पोलीस ठाण्यातून फरार झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांची पथके  आरोपीच्या शोधात रवाना झाली आहेत. 

तालुक्यातील सोमठाणा येथील ५८ वर्षीय तुकाराम निर्वळ यांचा शेती खरेदीच्या वादातून लाठ्या काट्याने मारहाण करून खून झाला होता. याप्रकरणी आठ जणांच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात शुक्रवारी २ सप्टेंबर रोजी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात मुख्य आरोपी असलेला मृताच सावत्र भाऊ छत्रपती निर्वळ याला पोलिसांनी लागलीच अटक केली. 

आरोपीस लॉकअप क्रमांक २ मध्ये ठेवण्यात आले होते. दरम्यान, आज पहाटे आरोपी निर्वळने तब्येत बरोबर नसल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी त्याला लॉकअपच्या बाहेर लोखंडी जाळी असलेल्या ठिकाणी ठेवले. याचाच फायदा घेत आरोपी पोलिसांची नजर चुकवून लोखंडी जाळीवरून उडी मारत फरार झाला. यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह मानवत पोलिसांचे तीन पथके आरोपीच्या शोधात रवाना झाले आहेत. तसेच उपविभागीय अधिकारी अविनाश कुमार पोलीस ठाण्यात तळ ठोकून आहेत.

आठ आरोपी पैकी एक अटक पण तोही झाला  फरारतालुक्यातील सोमठाणा येथील खून प्रकरणात आठ जणाविरुद्ध  गुन्हा दाखल केला आहे.  यापैकी मुख्य आरोपी असलेल्या छत्रपती निर्वळ  याला पोलिसांनी अटक केली होती. उर्वरित सात जण फरार झाले होते. मात्र अटक केलेला एक आरोपी थेट पोलीस ठाण्यातूनच फरार झाल्याने  पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीparabhaniपरभणी