घराचा दरवाजा तुटला नाही, चोरट्यांनी गेटमधील दुचाकी पळवली; दुसरीकडून २ लॅपटॉपही लंपास
By ज्ञानेश्वर भाले | Updated: December 27, 2023 16:48 IST2023-12-27T16:47:57+5:302023-12-27T16:48:39+5:30
सेलू शहरात दोन ठिकाणी झाल्या चोरीच्या घटना

घराचा दरवाजा तुटला नाही, चोरट्यांनी गेटमधील दुचाकी पळवली; दुसरीकडून २ लॅपटॉपही लंपास
सेलू (परभणी) : सेलू शहरात रविवारी रात्री आनंद नगर तर सोमवारी रात्री शासकीय विश्रागृह परिसरात एका खाजगी कोचींग क्लासेस मध्ये चोरीची घटना घटली अशी माहिती पुढे आली आहे.या घटनेतील आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये कैद झाले आहेत.
सेलू शहरातील आनंद नगर मधील सिद्धेश्वर सुभाष राऊत यांचे घरी २४ डिसेंबर रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी गेटमधून प्रवेश करीत घर फोडण्याचा प्रयत्न केला परंतु यश आले नाही. अखेर गेट मध्ये लावलेली शाईन कंपनीची मोटरसायकल (क्र. एम एच.२१ बी.एस.३९९४) किंमत ६५ हजार रूपये अशी दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली आहे.
दुसऱ्या घटनेत सोमवारी रात्री शासकीय विश्रामगृह परिसरात रस्त्यावरील एका खाजगी कोचींग क्लासेस मधील लॅपटॉप ,रोख रक्कम २५ हजार व ईतर साहित्याची चोरट्यांनी चोरी केली. विशेष म्हणजे या घटनेतील चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.
दरम्यान या दोन्ही ठिकाणच्या घटनास्थळी प्रभारी पो.नी.विजय कांबळे,पोलीस कर्मचारी व स्थागुशाचे पोउपनी गोपीनाथ वाघमारे, पोलीस हवालदार विलास सातपुते, मधुकर ढवळे,विष्णु चव्हाण यांनी भेट देऊन पंचनामा केला. या प्रकरणी एका घटनेतील अज्ञात चोरट्यांविरूध्द सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल दाखल झाला आहे तर दुसऱ्या घटनेतील गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती अशी माहिती पुढे आली आहे.