Video : लेंडी आणि गटाळी नदीच्या पुराने पालम तालुक्यात थैमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 11:35 IST2021-07-14T11:34:29+5:302021-07-14T11:35:11+5:30
Flood in Palam taluka : १० गावांचा संपर्क तुटला असून शहरातून जाणारा राष्ट्रीय मार्ग बंद पडला आहे

Video : लेंडी आणि गटाळी नदीच्या पुराने पालम तालुक्यात थैमान
पालम ( परभणी ) : तालुक्यात १३ जुलै रोजी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे हाहाकार उडाला आहे. लेंडी व गळाटी या दोन्ही नद्यांना मोठे पूर आला असून पूराचे पाणी पालम शहरासह ग्रामीण भागात अनेक गावात घुसले आहे. नदी काठच्या ५ हजार हेक्टर पिके पाण्याखाली गेली आहेत. तर गंगाखेड ते लोहा हा राष्ट्रीय मार्ग पुराच्या पाण्यामुळे वाहतूक करण्यासाठी बंद पडला आहे.
तालुक्यात मागील दोन दिवसात विविध भागात अतिवृष्टी झाली आहे भरपूर पाणी झाल्याने पाऊस पडताच पावसाचे पाणी नदीनाल्यांनी खळबळून वाहत आहे १३ जुलै रोजी रात्री ९ च्या सुमारास मुसळधार पाउस सुरू झाला होता रात्रभर जोरदार पाऊस पडल्याने लेंडी व गळाटी नदीला पूर आला आहे. दोन्ही नद्यातील पूराचे पाणी पात्र सोडून आजूबाजूला १हजार फुटापर्यंत शेतातून वाहत आहे पालम शहरात मारोती मंदीर पर्यंत पूराचे पाणी घुसले आहे तसेच पुयणी येथे गावाच्या पेशीपर्यंत पुराचे पाणी घुसले आहे लेंडी नदीला पालम ते पुयणी रस्त्यावर चा पूल पाण्याखाली गेल्याने पुयणी, आडगाव, वनभूजवाडी तसेच पालम ते जांभूळ बेट रस्त्यावरचा पुलावर १३ फुट पाणी वाहत आहे.
लेंडी आणि गटाळी नदीच्या पुराने परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यात थैमान pic.twitter.com/ei53GGSKpi
— Lokmat Aurangabad (@milokmatabd) July 14, 2021
यामुळे आरखेड, फळा, सोमेश्वर, घोडा, उमरथडी, सायळा या गावांचा संपर्क तुटला आहे. केरवाडी येथे गळटी नदीचे पाणी पूलाच्या दोन्ही बाजूला वाहत असल्याने गंगाखेड ते लोहा हा राष्ट्रीय मार्ग सकाळी २ तास वाहतूकीसाठी बंद पडला होता. लेंडी व गळाटी नदीला आलेल्या पूराने तालुक्यात अक्षरशः थैमान घातले आहे. दोन्ही नद्यांच्या काठावरील कापूस, सोयाबीन, मुग, तूर, उडीद, ऊस या पिकात पाणी घुसल्याने ५ हेक्टर पिकाची प्रचंड प्रमाणात नासाडी झाली आहे.