Tempos fire carrying coal in Palam | पालम येथे दगडी कोळसा नेणाऱ्या टेंपोस आग

पालम येथे दगडी कोळसा नेणाऱ्या टेंपोस आग

ठळक मुद्देकेरवाडी जवळील घटना

पालम - राष्ट्रीय मार्गावर संभाजीनगर पाटीनजीक कोळशाच्या टेंपोने अचानक पेट घेतल्याची घटना बुधवारी (दि.16) दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. या आगीत वाहन जळून खाक झाले असून मोठे नुकसान झाले आहे.

गंगाखेडवरून पालमकडे एक टेंपो वीटभट्टीसाठी लागणारा कोळसा घेऊन जात होता.  संभाजीनगर पाटीजवळ टेंपोस अचानक आग लागली. आग लागल्याचे चालकाच्या लक्षात येताच त्याने टेंपो रस्त्याच्या कडेला घेतला. यानंतर आगीने उग्ररूप धारण केले यात संपूर्ण टेंपो जळून खाक झाला. चालकाने प्रसंगावधान राखून टेंपो कडेला लावत दूर थांबल्याने जीवितहानी टळली. या टेंपोचा क्रमांक कळू शकला नाही. परिसरात आगीच्या ज्वाळा व धूर मोठ्याप्रमाणात पसरला होता. राष्ट्रीय मार्गावर ही घटना घडल्याने दोन्ही बाजूला वाहने खोळंबली होती. 

Web Title: Tempos fire carrying coal in Palam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.