विद्यापीठाचे तंत्रज्ञान कृषी विकासाला फायदेशीर ठरेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:24 IST2021-02-26T04:24:02+5:302021-02-26T04:24:02+5:30
वसंतराव नाईक़ मराठवाडा कृषी विद्यापीठात राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प- नाहेप अंतर्गत २६ केव्ही सौर ऊर्जा प्रकल्प, कॅड कॅम ...

विद्यापीठाचे तंत्रज्ञान कृषी विकासाला फायदेशीर ठरेल
वसंतराव नाईक़ मराठवाडा कृषी विद्यापीठात राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प- नाहेप अंतर्गत २६ केव्ही सौर ऊर्जा प्रकल्प, कॅड कॅम प्रयोगशाळा, शीतगृह आणि शीतकरण व्हॅनचे उद्घाटन २५ फेब्रुवारी रोजी आ.सतीश चव्हाण आणि आ.डॉ.राहुल पाटील यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी आ.पाटील बोलत होते.
अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ.अशोक ढवन तर प्रमुख पाहुणे म्हणून विद्यापीठ कार्यकारी परिषदेच्या सदस्य डॉ.आदिती सारडा, शरद हिवाळे, लिंबाजीराव भोसले, कुलसचिव रणजीत पाटील, शिक्षण संचालक डॉ.डी.एन.गोखले, संशोधन संचालक डॉ.दत्तप्रसाद वासकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ.डी.बी. देवसरकर, विद्यापीठ नियंत्रक दीपराणी देवतराज, प्राचार्य डॉ.यु.एन.खोडके, डॉ.डी.व्ही.आसेवार, प्रा.डी.डी.टेकाळे आदींची उपस्थिती होती. कृषी विद्यापीठाने अनेक नाविण्यपूर्ण प्रकल्प उभारुन एक चांगला पायंडा पाडला आहे. नाहेप प्रकल्पाच्या माध्यमातून डीजीटल शेती तंत्रज्ञानाला चालना देण्याचे काम होत असल्याचे आ.पाटील म्हणाले. यावेळी आ.सतीश चव्हाण यांनीही मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोपात कुलगुरु डॉ.अशोक ढवन म्हणाले, संशोधक विद्यार्थी व शास्त्रज्ञांना नाहेप प्रकल्पातील तंत्रज्ञान व प्रयोगशाळेचा लाभ होणार असून हे तंत्रज्ञान शेती उपयुक्त ठरणार आहे. नाहेपचे डॉ.गोपाळ शिंदे यांनी प्रकल्पाची माहिती दिली. डॉ.मेघा जगताप यांनी सूत्रसंचालन केले.
विविध तंत्रज्ञानाची दिली माहिती
या प्रकल्पांतर्गत विकसित केलेल्या विविध तंत्रज्ञानाबद्दल शास्त्रज्ञांनी यावेळी माहिती दिली. अभियंता अपूर्वा देशमुख यांनी मल्टीस्पेक्ट्रल कॅमेरा, रिअल सेन्स कॅमेरा, लिडार कॅमेरा, स्पेक्ट्रोरेडिओ मीटर आदी विषयी, खेमचंद कापगते यांनी थ्रीडी स्कॅनर विषयी तर रविकुमार कल्लोजी यांनी कॅडकॅम प्रयोगशाळेच्या कृषीतील उपयोगाबद्दल माहिती दिली.