शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

रस्त्याच्या कामासाठी अभियंत्याच्या टेबल-खुर्चीवर माती टाकत ग्रामस्थांचा संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 16:14 IST

वर्षभरा पूर्वी मंजूर रस्त्याचे काम सुरु होत नसल्याने केले अनोखे आंदोलन

ठळक मुद्देअभियंत्याकडून उडवाउडवीची उत्तरे दिल्याने ग्रामस्थ संतप्त

परभणी : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत रस्त्याच्या कामाची मुदत संपूनही कामाला सुरुवातही झाली नसल्याने संतप्त झालेल्या वांगी येथील ग्रामस्थांनी सोमवारी (दि.२३) दुपारी १ वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयात जाऊन टेबल- खुर्चीवर आणि कार्यालयात माती टाकून आपला संताप व्यक्त केला. 

परभणी तालुक्यातील वांगी या गावापासून वसमत रोडपर्यंत १.८००  मीटर लांबीच्या रस्त्याला मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजुरी मिळाली आहे. जुलै २०१८ मध्ये या कामाला कार्यारंभ आदेश देण्यात आले. एक वर्षांच्या मुदतीत रस्त्याचे काम पूर्ण करणे अपेक्षित असताना कंत्राटदाराने मुदत संपल्यानंतरही कामाला सुरुवात केली नाही.  या प्रश्नी प्रशासनाला निवेदन देऊनही पावले उचलली जात नसल्याने सोमवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह वांगी येथील ग्रामस्थांनी स्टेशन रोड परिसरातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कार्यकारी अभियंत्यांचे कार्यालय गाठले. परंतु यावेळी जबाबदार अधिकारी उपस्थित नव्हते. त्यामुळे वांगी येथून सोबत आणलेली माती कार्यकारी अभियंत्यांच्या खुर्चीवर आणि कार्यालयात टाकून संताप व्यक्त करण्यात आला. या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे किशोर ढगे, भास्कर खटिंग, परमेश्वर खनपटे, दिगंबर पवार, केशव निर्मळ, मुंजाभाऊ लोंढे, तुकाराम शिंदे, केशव भोसले, गोविंद दुधाटे, अंगद शिंदे, अच्युत ढगे आदींसह वांगी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

टॅग्स :Swabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाagitationआंदोलनparabhaniपरभणीhighwayमहामार्ग