सोनपेठ येथे कर्जबाजारीपणामुळे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 18:56 IST2018-03-09T18:30:41+5:302018-03-09T18:56:02+5:30
कोठाळा येथील तरुण शेतकरी मुंजाभाऊ लिंबाजी बोरटकर (वय २३ वर्षे) यांने सततच्या दुष्काळी आणि नापिकीला कंटाळून गुरुवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली.

सोनपेठ येथे कर्जबाजारीपणामुळे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
सोनपेठ (परभणी) : तालुक्यातील कोठाळा येथील तरुण शेतकरी मुंजाभाऊ लिंबाजी बोरटकर (वय २३ वर्षे) यांने सततच्या दुष्काळी आणि नापिकीला कंटाळून गुरुवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली.
मुंजाभाऊ यांच्या नावावर कोठाळा शिवारात चार एकर जमिन असून त्यांच्या नावावर महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे 30 हजार रूपयाचे कर्ज आहे. गुरुवारी सकाळी मुंजाभाऊ हे शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी जातो म्हणून घरून निघाले होता. गेल्या काही वर्षांपासून अत्यंत दुष्काळी परिस्थिती आणि आर्थिक अडचणीचा ते सामना करत होते. यातून आलेल्या नैराश्यातून त्यांनी शेतात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. त्यांच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ असा परिवार आहे.