गंगाखेड येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 18:21 IST2018-08-30T18:14:58+5:302018-08-30T18:21:51+5:30
दत्त मंदिर परिसरात एका तरुणाने राहत्या घरी आत्महत्या केल्याची आज सकाळी उघडकीस आली.

गंगाखेड येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
गंगाखेड (परभणी) : दत्त मंदिर परिसरात एका तरुणाने राहत्या घरी आत्महत्या केल्याची आज सकाळी उघडकीस आली. मारोती नागोराव मुकनर (३१, रा. आनंदवाडी ता. पालम ) असे मृताचे नाव असून त्यांच्या आत्महत्यचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
शहरातील दत्तमंदिर परिसरातील रेणुका नगर भागात मारोती नागोराव मुकनर किरायाच्या घरात राहतो. आज सकाळी १०:४५ वाजता घरमालक बालाजी धोंडकर यांना मारोती यांनी घरात आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. धोंडकर यांनी ही माहिती त्यांची पत्नी व पोलीस ठाण्यात दिली.
घटनेची माहिती मिळताच मारोती यांची पत्नी घरी आली. शेजाऱ्यांच्या मदतीने घराचा दरवाजा तोडण्यात आला. मात्र तोपर्यंत मारोती यांचा मृत्यू झाला होता. सपोनि सुरेश थोरात, जमादार वसंत निळे, शिवाजी मोरे (देशमुख), वेदप्रकाश भिंगे, मुक्तार पठाण, सुनिल लोखंडे यांनी पंचनामा केला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. आत्महत्येचे कारण समजले नाही. पुढील तपास जमादार वसंत निळे, मुक्तार पठाण हे करत आहेत.